अमोल मिटकरी म्हणतात पंकजा मुंडे यांचे राष्ट्रवादीत स्वागत

| Updated on: Sep 29, 2022 | 10:00 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी केले. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

अमोल मिटकरी म्हणतात पंकजा मुंडे यांचे राष्ट्रवादीत स्वागत
Follow us on

पुणे : मी पक्षाशी प्रामाणिक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील (PM Narendra Modi) मला पराभूत करू शकणार नाहीत, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी केले. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांचे राष्ट्रवादीत स्वागत…. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी(Amol Mitkari ) यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

पंकजा मुंडे भाजप पक्षात प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्या लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरी म्हणाले. पंकजा ताईंचे राष्ट्रवादीत स्वागत आहे अस म्हणत अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याचं आवाहन केले आहे.

पंकजाताईंना डावलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे. फडणवीस सरकारकडून सातत्याने असं होत आहे. आतापर्यंत त्यांना विधान परिषदेवर संधी दिलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याच्या कन्या असूनही आतापर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही.

पंकजा भाजमध्ये अस्वस्थ आहेत. त्या लवकरच भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देतील एवढ निश्चित असल्याचा दावा मिटकरी यांनी केला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जे वक्तव्य केलं तर खरंच आहे. शरद पवार ज्या ज्या वेळी महाराष्ट्राचा दौरा करतात त्यावेळी राज्यात सत्तांतर होते साताऱ्यातील सभा त्याचं उदाहरण आहे असं म्हणत मिटकरी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

काही लोकं शरद पवारांचे नाव स्वतःच्या पब्लिसिटीसाठी घेतात. त्यांना महत्व देण्याची गरज नाही. मात्र त्यांचे बारामतीत डिपॉझिट जप्त झाले आहे असा टोला त्यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला.

शरद पवार सोडा मात्र आम्ही जरी बाहेर पडलो तरी तुमचे डिपॉझिट जप्त होईल असं म्हणत त्यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.