Aurangabad Renaming: औरंगाबाद, उस्मानाबाचे नाव अखेर बदलले, ठाकरे कॅबिनेटचे 10 मोठे ऐतिहासिक निर्णय

| Updated on: Jun 29, 2022 | 6:45 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक होत आहे. ही मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जातेय. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. औरंगाबाद शहराचे नाव "संभाजीनगर" असं करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर होता. अखेर प्रत्यक्षात नामांतराचा हा प्रस्ताव मान्य करुन शिवसेनेने मास्टर स्ट्रोक मारला आहे.

Aurangabad Renaming: औरंगाबाद, उस्मानाबाचे नाव अखेर बदलले, ठाकरे कॅबिनेटचे 10 मोठे ऐतिहासिक निर्णय
Follow us on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष धक्कादायक वळणावर येऊन पोहचला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या आदेशानुसार ठाकरे सरकारला(Thackeray Government) बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. अशात महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेट बैठकांचा धडाका लावला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाचे नाव अखेर ठाकरे सरकारने बदलले आहे(Aurangabad Renaming). कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने 10 मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.

औरंगाबाद शहराचे नामांतर हा शिवसेनेचा मास्टर स्ट्रोक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक होत आहे. ही मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जातेय. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. औरंगाबाद शहराचे नाव “संभाजीनगर” असं करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर होता. अखेर प्रत्यक्षात नामांतराचा हा प्रस्ताव मान्य करुन शिवसेनेने मास्टर स्ट्रोक मारला आहे.

अवघ्या दोन मिनिटात काँग्रेसचे दोन मंत्री बैठकीतून बाहेर पडल्याने चर्चेला उधाण

ही बैठक सुरु झाली असतानाच अवघ्या दोन मिनिटात काँग्रेसचे दोन मंत्री बैठकीतून बाहेर पडले आहे. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि अस्लम शेख हे मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्यानं चर्चेला उधाण आले. मात्र, आपल्या विभागाच्या फाईल घेऊन वर्षा गायकवाड पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाल्या.

ठाकरे कॅबिनेटचे 10 मोठे ऐतिहासिक निर्णय

  1. • औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.
  2.  उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता.
  3.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
  4.  राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)
  5.  कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार (विधि व न्याय विभाग)
  6. अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
  7. ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
  8.  विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
  9. निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय
  10.  शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.

मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, मुख्यमंत्र्यांचे कॅबिनेटमध्ये भाषण

मला माझ्याच काहीच लकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्भवली, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.