बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 07, 2023 | 11:21 PM

आपल्याला व्यथित करणारं राजकारण झालं. आणि त्याची कल्पना दिल्ली हायकमांडला दिल्याचं थोरात यांनी सांगितलंय. तर थोरात-पटोले यांच्यामधले संबंध फार ताणले गेल्याचं दिसतंय.

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
बाळासाहेब थोरात, नाना पटोले
Follow us on

मुंबई : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यामधील वाद आता राजीनाम्यापर्यंत आलाय. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. पण, अद्याप दिल्लीतील हायकमांडनं थोरात यांचा राजीनामा स्वीकारला नाही. बाळासाहेब थोरात म्हणाले, सत्यजित तांबे माझ्या घरातले आहेत. राजकारणात नातं जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सत्यजितसाठी मी दिल्लीतल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजितला पाठिंबा देण्यासाठी सगळे तयार होते. मात्र अचानक शेवटच्या दिवसात राजकारण झालं. मला अंधारात ठेवून सगळं राजकारण करण्यात आलं.

एच. के. पाटील यांनाही अंधारात ठेवलं अशी मला शंका आहे. नाराजीचं पत्र लिहिल्यावर दिल्लीतून मला फोन आले. माझ्या नाराजीबद्दल दिल्लीतून विचारणाही झालीय. पण आपल्याकडे बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आलाच नसल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतायत.

आपल्याला व्यथित करणारं राजकारण झालं. आणि त्याची कल्पना दिल्ली हायकमांडला दिल्याचं थोरात यांनी सांगितलंय. तर थोरात-पटोले यांच्यामधले संबंध फार ताणले गेल्याचं दिसतंय. कारण बाळासाहेब थोरात माझ्याशी बोलतच नसल्याचं पटोलेच म्हणतायत.

माहिती अजित पवार यांना पटोले यांना नाही

नाना पटोले म्हणतायत की माझ्यापर्यंत थोरातांच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा आला नाही. पण थोरातांनी राजीनामा दिल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही सांगितलंय. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला असता, थोरातांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं, असं अजित पवार म्हणालेत.

थोरात यांनी वादावर बोलणं टाळलं

थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमात थोरातांनी तब्येतीच्या कारणात्सव ऑनलाईन हजेरी लावली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छाही स्वीकारल्या. पण पटोले यांच्यासोबतच्या वादावर बोलणं टाळलं.

पटोले यांनी चुकीचा एबी फार्म दिल्याचा आरोप

थोरात आणि पटोले यांच्यामध्ये वादाची ठिणगी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीतच पडली. भाचे सत्यजित ताबेंना उमेदवारीवरुन सगळं ठरलं असताना, शेवटच्या क्षणी राजकारण झाल्याची भावना थोरातांची आहे. तर आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी, चुकीचे एबी फॉर्म दिल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनीही केला. मात्र चुकून सत्यजित तांबे यांना नागपूरचा एबी फॉर्म दिला. मात्र नंतर योग्य एबी फॉर्म दिल्याचं पटोलेंनी tv9शी बोलताना सांगितलंय.

बावनकुळे यांची थोरात यांना ऑफर

काँग्रेसमध्ये सध्या 2 गट पडल्याचं दिसतंय. आशिष देशमुख यांनी तर नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचाच राजीनामा मागितलाय. थोरात-पटोले यांच्या वादात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी थोरातांना एकप्रकारे ऑफर दिलीय.

बाळासाहेब थोरात बोलत नाहीत, हे पटोलेंनीच सांगितलंय. म्हणजेच संबंध फार विकोपाला गेलेत. त्यामुळं थोरात यांनी थेट दिल्लीत हायकमांडकडेच विधिमंडळाच्या नेतेपदाचा राजीनामा दिलाय. आता तोडगा निघणार की मग कारवाई होणार ? याचा निर्णय हायकमांडलाच घ्यायचाय.