चिपळूणमध्ये आल्यावर भास्कर जाधव का रडले?

| Updated on: Oct 21, 2022 | 7:32 PM

बोलता बोलता भास्कर जाधव का रडायला लागले?

चिपळूणमध्ये आल्यावर भास्कर जाधव का रडले?
Follow us on

चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावरचा हल्ला (Attack) झाला. यानंतर प्रथमच भास्कर जाधव प्रथमच चिपळूणमध्ये आले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते भावूक झाले. बोलता बोलता भास्कर जाधव रडायला लागले. मी घेतलेली भूमिका माझ्या सहकाऱ्यांना मान्य आहे त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं असं भास्कर जाधव म्हणाले.

19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या चिपळूण येथील घरावर दगडफेक झाली. भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेकले, स्टंम्प फेकले आणि बाटल्या फेकून अज्ञात हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यामागे सरकारचाच हात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

मला कधी कुठलाही निर्णय घ्यायचा असल्यास मी माझ्या मनाने निर्णय घेतो. सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे. यामुळे माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला. मी बाळासाहेबांची शिवसेना पाहिलेली आहे, शिवसेनेवर आघात होत होता तेव्हा मला यातना होत होत्या असं भास्कर जाधव म्हणाले.

शिवसेना संपवण्याचा अनेकदा भाजपने प्रयत्न केला. पण, शिवसेना संपली नाही, त्यानंतर त्यांनी आमचे 40 लोकं फोडले. शिवसैनिकांना पुन्हा साद घालण्याचा मी निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पहिल्यासारखी गरजायला लागली.

मी घेतलेली भूमिका माझ्या सहकाऱ्यांना मान्य आहे त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं असं भास्कर जाधव म्हणाले. गेले 40 वर्ष मी राजकारणात आहे. ज्या ज्या वेळी माझ्यावर आघात होतो. त्यावेळी माझ्यासोबत शिवसैनिक असतात.

मला कधी गर्दी गोळा करावी लागत नाही, कधीच माझ्या सहकाऱ्यांना सूचना करावी लागत नाही. सर्व सहकारी माझ्या पाठिशी उभे राहतात.