भारत जोडो यात्रेत बॉक्सर विजेंदर सिंह हे राहुल गांधी यांच्यासोबत, याठिकाणी घेतला सहभाग

| Updated on: Nov 26, 2022 | 7:54 PM

बॉक्सर आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंह यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

भारत जोडो यात्रेत बॉक्सर विजेंदर सिंह हे राहुल गांधी यांच्यासोबत, याठिकाणी घेतला सहभाग
राहुल गांधी, विजेंदर सिंह
Follow us on

भोपाळ – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. शुक्रवारी बॉक्सर आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंह सहभागी झाले. या यात्रेचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियातून शेअर केले. त्यासोबत त्यांनी लिहीलं की, मूछों पर ताव, बाजुओ में दम, फौलादी इरादे, जोशीले कदम. फोटोत राहुल गांधी आणि विजेंदर सिंह मिशीवर ताव मारताना दिसत आहेत. पदयात्रेपूर्वी सावधान इंडिया फेम कलाकार सुशांत सिंह, रश्मी देसाईसह काही टीव्ही सीरीअल कलाकारांनी भाग घेतला.

बॉक्सर आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंह यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यात्रेत भाग घेण्यापूर्वी विजेंद्र सिंह यांनी ट्वीट करून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विचारानं प्रेरित होऊन सहभागी होणार असल्याचं सांगितलं. यात्रा मध्यप्रदेशात सुरू आहे.

काँग्रेस नेता जयराम रमेश म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या व्हिडीओत भाजपच्या आयटीकडून शेअर केलेल्या व्हिडीओत छेडछाड केली आहे. जेणेकरून ही यात्रा बदमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपला याचा करारा जबाब देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जयराम रमेश म्हणाले, भाजपच्या डर्टी ट्रीक्स डिपार्टमेंट्या व्हिडीओत छेडछाड करण्यात आली आहे. आम्ही तात्काळ आवश्यक ती कारवाई करणार असल्याचंही जयराम रमेश यांनी ट्वीट केलंय. याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेनं ७९ व्या दिवशी खरगोन जिल्हात प्रवेश केला. राज्य सरकारवर निशाणा साधला. सगळ्यात जास्त खराब रस्ते येथील असल्याचंही ते म्हणाले. भाजप गेल्या १९ वर्षांपैकी १७ वर्षे सत्तेत आहे.