दसरा मेळावा शिवतीर्थावरही घेता आला असता पण… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले

| Updated on: Oct 02, 2022 | 4:45 PM

दसरा मेळावा दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.

दसरा मेळावा शिवतीर्थावरही घेता आला असता पण... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले
Follow us on

मुंबई : दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात थेट आमना सामना होणार आहे. हा दसरा मेळावा दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

हस्तक्षेप केला असता तर शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदान निवडण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे.

कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बीकेसी मैदान निवडल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले. तसेच मुख्यमंत्री म्हणून कायदा-सुव्यवस्था टिकविणे माझी जबाबदारी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आक्रमक होते. अखेरीस हा वाद कोर्टात गेला होता.

शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास ठाकरे गटाला न्यायालयाकडून परवानगी मिळाली. यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसे मैदानावर होणार आहे.

एकाच दिवशी दोन्ही गटाचे मेळावे होणार असल्याने आता गर्दी जमवण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोवन्ही गटांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.