Eknath Shinde Aggressiveउद्धव ठाकरेंनी बाप काढल्यानंतर एकनाथ शिंदे झाले आणखी आक्रमक; दाऊदचं नाव घेत शिवसेनेसह थेट राष्ट्रवादीलाच दिले चॅलेंज

| Updated on: Jun 26, 2022 | 10:22 PM

शिंदे यांनी या ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कथीत मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपांमध्ये जेल मध्ये आहेत. या ट्विट्च्या माध्यमातून शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडावी अशी मागणी एकनाथ शिंदेच्या या बंडखोर गटाकडून करण्यात येत आहे.

Eknath Shinde Aggressiveउद्धव ठाकरेंनी बाप काढल्यानंतर एकनाथ शिंदे झाले आणखी आक्रमक; दाऊदचं नाव घेत शिवसेनेसह थेट राष्ट्रवादीलाच दिले चॅलेंज
ठाकरे विरुद्ध शिंदे
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी चिघळत चालला आहे. शिवसेनेचे(Shivsena) शक्ती प्रदर्शन सुरु असतानाच शरद पवारही सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी(uddhav thackeray) बाप काढल्यानंतर एकनाथ शिंदे झाले आणखी आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. शिंदे यांनी थेट ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. संजय राऊतांच्या जहरी टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे यांचे ट्विट अत्यत स्फोटक असून हा बंडखोर गट माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.

दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..
मरण जरी आलं तरी बेहत्तर

हे सुद्धा वाचा

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….
तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू… अशा आशयाचे ट्विट शिंदे यांनी केले आहे.

शिंदे यांनी या ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कथीत मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपांमध्ये जेल मध्ये आहेत. या ट्विट्च्या माध्यमातून शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईबाबत भाष्य केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडावी अशी मागणी एकनाथ शिंदेच्या या बंडखोर गटाकडून करण्यात येत आहे.

संजय राऊतांच्या टीकेला उत्तर

चाळीस लोक गुवाहाटीत बसले आहेत. मजा करत आहेत. मात्र ते जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे. त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होणार असं संजय राऊत म्हणाले होते. यानंतर बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा, राऊतांना केसरकरांचे चॅलेंज

खासदार संजय राऊत यांनी तर बंडखोर आमदारांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘जे इथे राहिले ते एका बापाचे आणि तिकडे गेले ते 10 बापाचे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी जाहीर व्यासपीठावरुन केलंय. राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता शिंदे गटातील आमदारही आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तसंच त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा, असं थेट आव्हानच दिलं आहे.

संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, ‘आम्ही एका बापाचे आणि जे गेले ते 10 बापाचे असं त्यांचं वक्तव्य होतं. आम्ही ते उच्चारूही नये एवढं ते घाणेरडं वाक्य आहे. एखाद्या व्यक्तीला अनेक बाप याचा अर्थ काय होतो. या महाराष्ट्राने महिलांचे नेहमी इज्जत केली, सन्मान केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनीही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईची उपमा दिली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नावं घेऊन चालणाऱ्या शिवसेनेला असा प्रवक्ता चालतो का? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय.