मुख्यमंत्रीपद ही काय तुमची जहांगिरदारी आहे काय? एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला सवाल

| Updated on: Oct 05, 2022 | 9:33 PM

सरंजामदार, भांडवलदार आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलेच मुख्यमंत्री होऊ शकतात का? ही काय तुमची जहागिरदारी आहे का?

मुख्यमंत्रीपद ही काय तुमची जहांगिरदारी आहे काय? एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला सवाल
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( cm eknath shinde) यांनी मुख्यमंत्रीपदावरुन थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्रीपद ही काय तुमची जहांगिरदारी आहे काय? असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. BKC मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळाव्याला तुफान गर्दी पहायला मिळाली.

ही काय तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. ही या लोकांच्या घामातून शिवसेना उभी राहिली आहे. ती कुणाच्याही दावणीली बांधता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ही लिमिटेड कंपनी नाही. ही शिवसैनिकांची शिवसेना आहे. आम्हाला काय काय म्हणून हिणवलं. आम्हाला डुकरं म्हटलं. प्रत्येकाने आपला तालुका शिवसेनामय केला नसता तर तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचला असता का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

बाळासाहेब म्हणायचे हे शिवसैनिक आहेत. म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. आमदार गेले. खासदार गेले. तरी मीच आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत. हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं.

पोटापाण्यासाठी जे व्यवसाय केले. त्याची खिल्ली उडवताय. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. टपरीवाला मंत्री होऊ शकत नाही का?

सरंजामदार, भांडवलदार आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलेच मुख्यमंत्री होऊ शकतात का? ही काय तुमची जहागिरदारी आहे का?

चहावाला पंतप्रधान झाला. म्हणून खिल्ली उडवणारा पक्षाच जागेवर नाही. त्या पक्षाची अवस्था काय झाली. त्यांना अध्यक्ष मिळत नाही. पक्ष आहे पण अध्यक्ष नाही. इथे अध्यक्ष आहे, पण पक्षच नाही असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.