Jalgaon | जळगावचे किशोर पाटील अजूनही ठाकरेंच्या प्रेमात, ऑफिसातले बॅनर्स हटलेच नाही, म्हणाले… ते येईपर्यंत तरी..

| Updated on: Aug 19, 2022 | 3:59 PM

आमदार किशोर पाटील यांच्या जळगावमध्ये उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला किती गर्दी होणार, ते किशोर पाटील यांच्यावर काय टीका करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Jalgaon | जळगावचे किशोर पाटील अजूनही ठाकरेंच्या प्रेमात, ऑफिसातले बॅनर्स हटलेच नाही, म्हणाले... ते येईपर्यंत तरी..
किशोर पाटील, शिवसेना आमदार, जळगाव
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगावः एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात गेलेल्या बहुतांश शिवसेना आमदारांनी आपापल्या कार्यालयातले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो, बॅनर्स हटवले आहेत. पण जळगावचे आमदार किशोर पाटील यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंचं एक मोठं बॅनर लावलंय. मग किशोर पाटील यांनीच हे बॅनर्स अद्याप का ठेवलेत, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर किशोर पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिलं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा उद्या जळगावमध्ये दौरा आहे. यानिमित्त आपण त्यांचं स्वागत करणार असल्याचंही किशोर पाटील यांनी सांगितलं. त्यांनी ठाकरेंना टोलाही लगावला. असे दौरे आधीच केले असते तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती.. असं ते म्हणाले. जळगावमधून आमदार किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाचा रस्ता धरला असला तरीही त्यांचीच बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय होण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे किशोर पाटील यांचे मूळ शिवसेनेशी असलेलं नातं काही सुटता सुटत नाहीये, अशी चर्चा सध्या जळगावात होतेय.

बॅनर्स काढले नाहीत म्हणाले….

आमदार किशोर पाटील यांच्या जळगावमध्ये उद्या आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला किती गर्दी होणार, ते किशोर पाटील यांच्यावर काय टीका करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावर आमदारांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता त्यांच्या कार्यालयातील बॅनर्स पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या बहुतांश आमदारांनी ठाकरेंचे बॅनर्स, फोटो हटवलेत. यावर बोलताना किशोर पाटील म्हणाले, कोणतही काम करताना घाई करू नये. 22 वर्ष त्यांच्या सान्निध्यात होतो. समोरचे हातघाईवर आले.. आल्या आल्या फोटो काढून टाकले. मी त्यांनाही शुभेच्छा दिल्या. ते उद्या येतायत.. तोपर्यंत तर बॅनर्स राहू देत. मला भविष्यात काम कसं करायचंय, याचं पूर्णपणे प्लानिंग झालंय…

आदित्य ठाकरे यांना टोला..

आदित्य ठाकरे जळगावात आले तर त्यांचं मी स्वागतच करणार असल्याचं किशोर पाटील म्हणाले. पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले, ‘ मागच्या वेळीच मी त्यांचं पाचोरा शहरात स्वागत करणार होतो. काही कारणास्तव त्यांचा दौरा आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. खरं तर मी त्यांचं अभिनंदन करत असताना हीच विनंती करेन, एवढी तत्परता आधी दाखवली असती तर ही वेळ आली नसती. बाळासाहेब ठाकरेच आमच्या हृदयात होते. पण हे ठाकरे त्यांच्या विचारांनी चालत नाहीत म्हणून ही वेळ आली आहे….

हे सुद्धा वाचा

भाऊ शिंदेंकडे, बहीण ठाकरेंकडे… कार्यालय कुणाचे?

जळगावचे आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटाची वाट धरलीय, मात्र त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शवलाय. एवढेच नाही तर कार्यकर्त्यांसोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. आता आदित्य ठाकरे यांची निष्ठायात्रा जळगावात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेचं कार्यालयदेखील माझं असल्याचा दावा बहीण वैशाली यांनी केला. भावा-बहिणीच्या या वादात जळगावातील शिवतीर्थ हे कार्यालय आमदारांना रिकामे करावे लागले. तेथे ठाकरे गटाचे बॅनर्स लागले.