मंत्रीपद गेल्यानंतर पाठीशी उभं राहिले; त्यांच महंतांनी संजय राठोडांची साथ सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला?

| Updated on: Sep 26, 2022 | 6:15 PM

संजय राठोड यांना शिंदे सरकार मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना मुंबईला भेटायला गेलो असता त्यांनी 4 तास बसून वेळ दिला नाही असा आरोप महंतानी केला.

मंत्रीपद गेल्यानंतर पाठीशी उभं राहिले; त्यांच महंतांनी संजय राठोडांची साथ सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला?
Follow us on

वाशिम : मुंबई : शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड(Sanjay Rathore) यांना जबरदस्त झटका देणारी थटे पोहरादेवीतूनच आली आहे. मंत्रीपद गेल्यानंतरही बंजारा(Banjara Poharadevi ) समाजाचे महंत संजय राठोड यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले होते. आता याच महंतांनी संजय राठोडांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजाचे महंत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

या महंतासह 50 ते 60 टक्के बंजारा समाज उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. महंत सुनील महाराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. बंजारा समाजाचे तीन महंत शिवबंधन बांधणार असल्याचीही चर्चा होती.

यासंदर्भात खुद्द महंत सुनील महाराज यांनी खुलासा केला आहे. संजय राठोड यांना शिंदे सरकार मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना मुंबईला भेटायला गेलो असता त्यांनी 4 तास बसून वेळ दिला नाही असा आरोप महंतानी केला.

बंजारा समाजाच्या हितासाठी आणि पोहरादेवी संस्थान विकासासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे महंतांनी सांगीतले.
यानंतर संजय राठोड आणि माझा कोणताच संबंध राहणार नसल्याचेही यावेळी सुनील महाराज यांनी सांगितले आहे.

सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधल्यानंतर 50 ते 60 टक्के बंजारा समाज उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा आहे. बंजारा समाजाने शिवसेनेत प्रवेश केल्यास संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

संजय राठोड याचे बंजारा समाजात विशेष स्थान आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना वनमंत्री पद देण्यात आले. मात्र, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना मंत्रीपद सोडावे लागले.

यानंतर ते पोहरादेवीत देवीत दाखल झाल्यानंर महंत त्यांच्या पाठीशी उभे राहिले. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावं यासाठी पोहरादेवीचे महंत देखील आक्रमक झाले होते.

यानंतर संजय राठोड बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. त्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले आहे.