आत्ताची सर्वात मोठी बातमी; ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

| Updated on: Oct 13, 2022 | 3:41 PM

न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना उद्धव गटातील कार्य़कर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी; ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा
Follow us on

मुंबई : ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा दिला आहे.ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी ११ पर्यंत मंजूर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.ऋतुजा लटके यांना या निर्णयामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे.ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना उद्धव गटातील कार्य़कर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती, यानंतर शिवसेना उद्धव गटाकडून पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला.

पण, ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी होत्या. त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो मंजूर होत नव्हता. राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता.

अखेर ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा दिला आहे.ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 पर्यंत मंजूर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.