BMC Election2022 Ward 37 : काटेकी टक्कर असलेल्या वॉर्ड क्रमांक ३७ मध्ये भाजपच्या उमेदवाराने मारली बाजी

| Updated on: Jun 18, 2022 | 9:21 PM

आपण महापालिकेचा वॉर्ड क्रमांक ३७ बाबत अधिक माहिती पाहणार आहोत. हा वॉर्ड २०१७ ला स्त्रीयांसाठी राखीव होता. त्यावेळी तिथं ८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यावेळी त्या वॉर्डमध्ये एकूण २३०३५ मतदारांनी उमेदवारांच्या पारड्यात मतं टाकली.

BMC Election2022 Ward 37 : काटेकी टक्कर असलेल्या वॉर्ड क्रमांक ३७ मध्ये भाजपच्या उमेदवाराने मारली बाजी
काटेकी टक्कर असलेल्या वॉर्ड क्रमांक ३७ मध्ये भाजपच्या उमेदवाराने मारली बाजी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीच्या (mumbai municipal corporation elections) अनुशंगाने अनेक पक्षांनी आत्तापासून कंबर कसायला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीने मुंबईची (mumbai) वाट लावली हे दाखवण्यात विरोधक गुंग आहेत. तर विरोध लोकांना कशा पद्धतीने भडकावत आहेत हे सांगण्यात सत्ताधारी गुंग आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर या गोष्टी पाहायला मिळतात. सध्या मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची (shivsena) सत्ता आहे. भाजप आणि शिवसेनेची युती असताचं पालिकेतंल राजकारण वेगळं होतं. सध्या महाविकास आघाडीसोबत शिवसेना असल्याने राजकारण काही प्रमाणात बदललं असं म्हणायला हरकत नाही. मागील अनेक दिवसांपासून भाजप पालिका कशा पद्धतीने घोटाळा करीत आहे हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे.

हा वॉर्ड २०१७ ला स्त्रीयांसाठी राखीव होता

आपण महापालिकेचा वॉर्ड क्रमांक ३७ बाबत अधिक माहिती पाहणार आहोत. हा वॉर्ड २०१७ ला स्त्रीयांसाठी राखीव होता. त्यावेळी तिथं ८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यावेळी त्या वॉर्डमध्ये एकूण २३०३५ मतदारांनी उमेदवारांच्या पारड्यात मतं टाकली. वॉर्ड क्रमांक ३७ मध्ये सगळ्याचं पक्षाचे उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचं प्रयत्न करीत होते. त्यावेळी निर्माण झालेल्या चुरशीच्या लढाईत नेमकं कोण विजयी होईल हे कोणी सांगू शकत नव्हतं. परंतु तिथल्या नागरिकांनी भाजपच्या प्रतिभा हेमंत शिंदे यांना पसंती दिली. त्या पारड्यात एकूण 7815 मतं पडल्यानं त्या विजयी झाल्या. त्यावेळी झालेल्या निवडणूकीत कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे जाणून घ्या. त्याचबरोबर सगळ्यात कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळाली हे देखील जाणून घ्या.

उमेदवाराचे नाव  मतं

चौहान पुजा रणवीरसिंग शिवसेना 6363

हे सुद्धा वाचा

जाधव आरती आनंद अपक्ष 46

नाडकर मयुरी उत्तम भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) 232

अनुसया पवार (पवारलाई) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1444

रुपाली अजित रावराणे नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी 4624

प्रतिभा हेमंत शिंदे भारतीय जनता पार्टी 7815

अॅड. नंदा कमलदीप सिंग यूनाइटेड कांग्रेस पार्टी 62

जयश्री चंद्रकांत ठसाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2123

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर