Video : UP वाला ठुमका लगाऊं की… मुंबईत भाजपच्या छटपूजा कार्यक्रमात महिलांचा भोजपुरी डान्स

| Updated on: Oct 30, 2022 | 11:10 PM

मुंबईत भाजपच्या छटपूजा उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात महिला नर्तकांनी भोजपुरी गाण्यांवर डान्स केला.

Video : UP वाला ठुमका लगाऊं की... मुंबईत भाजपच्या छटपूजा कार्यक्रमात महिलांचा भोजपुरी डान्स
Follow us on

मुंबई : UP वाला ठुमका लगाऊं की… असाच काहीसा माहौल आज मुंबईत पहायला मिळाला. देशभरात छट पूजेचा उत्साह आहे. मुंबईतही छट पूजा उत्साहात साजरी झाली. मुंबईत विविध राजकीय पक्षांतर्फे विशेषत: भाजपतर्फे छटपूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत भाजपच्या छटपूजा उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात महिला नर्तकांनी भोजपुरी गाण्यांवर डान्स केला.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यातर्फे मागाठाणे मतदारसंघात भव्य छटपूजेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उत्तर भारतीयांसाठी संगीत कार्यक्रमाचं आयोजनही केलं होतं.

मुंबईतील अक्सा बीचवर महाराष्ट्र भाजपचे महामंत्री ब्रिजेश सिंग आणि प्रयास फाऊंडेशनच्या वतीने आयोजित छठ पूजा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

दोन्ही ठिकाणी भोजपुरी नृत्याचा रंगारंग कार्यक्रम झाला. महिला डान्सर स्टेजवर नाचत होत्या. भाजपच्या महामंत्री तसेच पदाधिकारी यांचे डान्स पाहत होते.

मुंबईत ठिकठिकाणी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात हजारो उत्तर भारतीय बंधू-भगिनींनी सहभाग घेतला. यावेळी महिलांनी छटमातेचे सूर्यास्त पूजन केले. मात्र, भाजपचे हे छट पूजा कार्यक्रमाचे आयोजन भोजपुरी डान्सच्या कार्यक्रमामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. या डान्सचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.