Raj Thackeray : ‘वेळ लागेल, पण तो …’ राज ठाकरे यांचा चाहता, पण अमराठी सरदारजींचं भाकीत

| Updated on: Nov 01, 2022 | 2:58 PM

सरदारजींना राज ठाकरे यांच्यात शीख समाजातील हा गुण आकर्षित करतोय, सरदारजी स्पष्ट बोलताना म्हणतोय...

Raj Thackeray : वेळ लागेल, पण तो ... राज ठाकरे यांचा चाहता, पण अमराठी सरदारजींचं भाकीत
पाहा नेमकं काय म्हणाले सरदारजी?
Image Credit source: Twitter Video Grab
Follow us on

मुंबई : एका शीख व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमधील शीख व्यक्ती राज ठाकरे (Raj Thackeray Latest News) यांची भरभरुन स्तुती करताना दिसून आली आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियात तुफान चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांची तुलना या व्हिडीओतील व्यक्तीने शीख समाजातील लोकांशी करत मनसे (MNS) अध्यक्षांचं कौतुक केलंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक बुजुर्ग पंजाबी व्यक्ती गाडी चालवत राज ठाकरेंबाबत बोलताना दिसली आहे. यावेळी पंजाबी व्यक्ती राज ठाकरेंचं कौतुक करते. इतकंच काय तर राज ठाकरे हे शीख समाजातील व्यक्तींप्रमाणे आहेत, ते कुणालाही घाबरत नाही, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांचे चाहते फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पसरलेले आहेत. हे देखील या व्हिडीओतून पाहायला मिळालं आहे. एक दिवस राज ठाकरे नक्कीच पुढे येतील आणि ते जिंकतील देखील, असा विश्वासही या शीख व्यक्तीने बोलून दाखवली. यावेळी ते म्हणाले की,…

राज ठाकरे आम्हाला आवडतात, कारण ते आमच्यासारखे आहेत. त्यांच्याकडे लढण्याचं काळीज आहे. जसा शीख समाज कुणालाही घाबर नाही, तसेच राज ठाकरेही कुणालाही घाबरत नाहीत. आम्ही फक्त देवाला घाबरतो. राज ठाकरेही तसेच आहेत. त्यामुळे आम्हाला ते आवडतात.

पाहा व्हिडीओ :

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला होता. शिवसेनेत असतानाही आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका चर्चेत राहिल्या. त्यावरुन राजकारण तापलं.

वेळोवेळी राज ठाकरे यांच्या महाराष्टातील चाहत्यांचे किस्से समोर येत असतात. मात्र आता थेट महाराष्ट्राबाहेरील व्यक्ती राज ठाकरेंबाबत स्तुती करताना दिसून आलीय.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र ज्या अर्थी बोलणारी व्यक्ती डाव्या बाजूला बसून गाडी चालवताना दिसली आहे, त्यावरुन हा व्हिडीओ परदेशातील असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.