Uddhav Thackeray : जेव्हा राजनाथ सिंह उद्धव ठाकरेंना अस्सलाम वालेकुम म्हणाले, पुढं काय झालं ते ठाकरेंनी मा. आमदारांना सांगितलं

| Updated on: Jul 12, 2022 | 3:51 PM

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुर्मु यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी करणारा एक फोन उद्धव ठाकरे यांनाही केला. त्यात सिंह यांनी फोनवरील संवादाची सुरुवात अस्सलाम वालेकुम अशी केली! खुद्द उद्धव ठाकरे यांनीच माजी आमदारांच्या बैठकीत हा किस्सा सांगितल्याचं कळतंय.

Uddhav Thackeray : जेव्हा राजनाथ सिंह उद्धव ठाकरेंना अस्सलाम वालेकुम म्हणाले, पुढं काय झालं ते ठाकरेंनी मा. आमदारांना सांगितलं
राजनाथ सिंह, उद्धव ठाकरे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीसाठी (Presidential Election) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी लावून धरलीय. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना आमदारांमध्ये खलबतं सुरु आहेत. आज शिवसेनेच्या माजी आमदारांची बैठक पार पडली. त्यातही मुर्मु यांना पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मुर्मु यांना पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मुर्मु यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी करणारा एक फोन उद्धव ठाकरे यांनाही केला. त्यात सिंह यांनी फोनवरील संवादाची सुरुवात अस्सलाम वालेकुम अशी केली! खुद्द उद्धव ठाकरे यांनीच माजी आमदारांच्या बैठकीत हा किस्सा सांगितल्याचं कळतंय.

राजनाथ सिंहांनी संवादाची सुरुवात अस्सलाम वालेकुम अशी केली?

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या माजी आमदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी माजी आमदारांनी केली. त्याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांना राजनाथ सिंहांबाबतचा एक किस्सा सांगितला. मुर्मु यांना पाठिंबा द्यावा यासाठी सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यावेळी सिंह यांनी संवादाची सुरुवात अस्सलाम वालेकुम अशी केली. तेव्हा आपण भडकलो. त्यानंतर जय श्रीराम असं म्हणत राजनाथ सिंह यांनी पुढे संवाद सुरु केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

शिवसेना द्रौपदी मुर्मुंना पाठिंबा देणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशावेळी शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. बैठकांचा सपाटा सुरु आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार, काही नेते आणि माजी आमदारांनी राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची मागणी केलीय. अशावेळी उद्धव ठाकरे मुर्मु यांना पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे आता शिवसेना आपला निर्णय कधी जाहीर करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या बैठकीला ‘एनडीए’चे शिंदे गटाला निमंत्रण

राष्ट्रपती निवडणुकीबाबत देशाच्या राजधानीत खलबतं सुरु आहेत. असे असताना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने होणाऱ्या बैठकीला एनडीए ने शिंदे गटालाही निमंत्रण दिले आहे. तर शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा हा देखील एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच असणार आहे. त्यामुळे या बैठकीला शिवसेनेलाही निमंत्रण दिले जाते का याकडे लक्ष लागले होते. मात्र, सेनेला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे निमंत्रण मिळालेले नाही.