रश्मी ठाकरे ठाण्यातून थेट संजय राऊत यांच्या घरी दाखल

| Updated on: Sep 29, 2022 | 8:19 PM

उद्धव ठाकरे यांच्यानंतर प्रथमच रश्मी ठाकरे यांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतली.

रश्मी ठाकरे ठाण्यातून थेट संजय राऊत यांच्या घरी दाखल
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात हजेरी लावली. यानंतर रश्मी ठाकरे थेट शिवसेना नेत्या संजय राऊतांच्या(Sanjay Raut) घरी पोहचल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर प्रथमच रश्मी ठाकरे राऊत कुटुंबियांच्या भेटीसाठी  दाखल झाल्या आहेत.संजय राऊत हे सध्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

ठाण्यात आल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी टेंभी नाका येथील देवीची महाआरती केली. यावेळी शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती. यानंतर त्या ठाण्यातून थेट संजय राऊतांच्या घरी निघाल्या.

संजय राऊत यांच्या कुटुंबाची रश्मी ठाकरे यांनी भेट घेतली. दरवर्षी राऊत कुटुंबाच्या घरी घटस्थापना केली जाते. याचबरोबर रेशमी ठाकरे यांनी घटस्थापनेचे दर्शन घेतले.

रश्मी ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिक संजय राऊत यांच्या घराजवळ जमले होते. रश्मी ठाकरे यांनी शिवसैनिकांची भेट देखील घेतली

संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री,  पत्नी आणि मुलींना उद्धव ठाकरेंनी धीर दिला होता.

31 जुलै 2022 रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर सकाळी 7 वाजता ईडीने धाड टाकली. तब्बल साडेनऊ तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर राऊत यांची दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी राऊतांना अटक झाली. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे.