रवींद्र जडेजाचं ट्वीट चर्चेत, बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ केला शेअर

| Updated on: Dec 01, 2022 | 10:25 PM

निवडणूक गुजरातची असो की महाराष्ट्राची असो तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचीच लागते.

रवींद्र जडेजाचं ट्वीट चर्चेत, बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ केला शेअर
रवींद्र जडेजा पत्नीसह
Follow us on

जामनगरमध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिलंय. या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलाय. रवींद्र जडेजा यानचं हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे म्हणतात, नरेंद्र मोदी गेले तर गुजरात गेलं. एवढंच माझं वाक्य आहे. हे मी अडवाणी यांच्यापासी बोललो आहे. गुजराती मतदारांनी भाजपलाचं मतदान करण्याचं आवाहन केलंय. गुजरातच्या जामनगरमध्ये रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला भाजपनं उमेदवारी दिली आहे. मात्र, जडेजाची बहीण आणि वडील काँग्रेसकडून प्रचार करतात. काँग्रेसकडून बिपेंद्रसिंह जडेजा हे उमेदवार आहेत.

रवींद्र जडेजा पत्नीसाठी प्रचार करतोय. बाळासाहेबांचा व्हिडीओ रवींद्र जडेजा यानं शेअर केला. त्यानंतर ठाकरे आणि भाजप यांचं नातं हे हिंदुत्वाचं नात होतं. आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं ते सोडलंय, असं आशिष शेलार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षाबरोबर आमची युती आहे. बाळासाहेबांचे विचार शिंदे यांच्याकडंच आहेत. बाळासाहेबांचे विचार मांडून भाजपचा कार्यकर्ता काम करत असेल, तर त्याचा मला अभिमान असल्याचंही आशिष शेलार यांनी जडेजा यांची पाठराखण केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, रवींद्र जडेजा यांचं ट्वीट बघीतलं. तो व्हिडीओसुद्धा बघीतला. मोदी यांच्या करिष्म्यावर काहीच होत नाही. निवडणूक गुजरातची असो की महाराष्ट्राची असो तुम्हाला गरज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचीच लागते. हे पुन्हा एकदा सिद्ध होते.

जामनगरमध्ये राजपूत आणि मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. 2012 मध्ये इथं काँग्रेसचा उमेदवार जिंकला होता. 2017 मध्ये इथली जागा भाजपनं जिंकली. आता रवींद्र जडेजाची पत्नी यामधून जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे.