Vidhan Parishad election result:काँग्रेससाठी लज्जास्पद पराभव, अखेरच्या टप्प्यात काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये झाली लढत, काँग्रेसनेच निश्चित केलेल्या पसंतीचा क्रम, काँग्रेसच्याच आमदारांनी नाकारला

| Updated on: Jun 20, 2022 | 11:49 PM

काँग्रेसने पहिल्या पसंतीचा क्रम चंद्रकांत हंडोरेंना दिला होता. म्हणजे त्यांचा या निवडमुकीतील विजय निश्चित मानण्यात येत होता. मात्र आमदारांनी हा क्रम मतदानात पाळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vidhan Parishad election result:काँग्रेससाठी लज्जास्पद पराभव, अखेरच्या टप्प्यात काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये झाली लढत, काँग्रेसनेच निश्चित केलेल्या पसंतीचा क्रम, काँग्रेसच्याच आमदारांनी नाकारला
congrss defeat
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad result)सर्वाधिक फटका बसलरा तो राज्यातील काँग्रेस (Congress)पक्षाला. सत्तेत असणाऱ्या या पक्षाकडे ४४ आमदारांचे स्वताचे संखअयाबळ असतानाही, पहिल्या फेरीत एक उमेदवार सरळपणे निवडणून आणता आला नाही. पहिल्या फेरीअखेरीस काँग्रेसचे दोन्ही उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore lost)आणि भाई जगताप यांच्यापैकी एकाला मतांचा ४६ मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता. हंडोरेंना पहिल्या फेरीच्या अखेरीस २२ मते फडली होती, तर भाई जगताप यांना केवळ २० मते पडलेली होती. त्यामुळे पक्षाची पूर्ण ४४ मतेही पहिल्या पसंतीच्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेली नाही, हे स्पष्टच झालेले आहे. शिवसेनेची तीन मते काँग्रेसला मिळणार होती, ती मिळाली असल्यास काँग्रेसची पाच मते फुटल्याची शक्यता आहे.

पहिल्या पसंतीच्या फेरीनंतर दुसऱ्या पसंतीच्या फेरीतही अब्रू गेली

काँग्रेसने पहिल्या पसंतीचा क्रम चंद्रकांत हंडोरेंना दिला होता. म्हणजे त्यांचा या निवडमुकीतील विजय निश्चित मानण्यात येत होता. मात्र आमदारांनी हा क्रम मतदानात पाळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुसऱ्या पसंतीची मतेही चंद्रकांत हंडोरेंना मिळाली नसल्याची शक्यता आहे. भाई जगताप यांनी यातही हंडोरेंवर मात केल्याचे दिसते आहे.

आमचेच आमदार फुटले, बाळासाहेब थोरातांची कबुली

पहिल्या पसंतीच्या फेरीची मतमोजणी समोर आल्यानंतर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचेच आमदार फुटल्याची कबुली दिली आहे. आमचेच आमदार आमच्यासोबत राहिलेले नाहीत, तेव्हा विरोधकांबाबत काय बोलावे, अशी खंत थोरात यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

दलित उमेदवाराचा पराभव होणे दुर्दैवी

या पराभवानंतर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विट करत चंद्रकांत हंडोरे यांच्यासारखा दलित उमेदवार पारभूत होते, हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ज्याला पहिल्या पसंतीची कोट्याची मते ठरलेली होती, त्याच्याऐवजी दुसऱ्या पसंतीचा उमेदवार जिंकतो ही अंतर्गत दुफळी असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

नाना पटोले मतदानानंतर नागपूरला रवाना

विधान परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर लगेचच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपूरकडे रवाना झाले होते. तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय होणार नाही, अशी शक्यता तेव्हाच व्यक्त होण्यास सुरुवात झाली होती. नाना पटोले यांच्याक़डे प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर, ही निवडणूक त्यांच्यासाठीही प्रतिष्ठेची होती. मात्र काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.