..त्यांना पाडण्याची जबाबदारी आमची : शरद पवार

| Updated on: Nov 23, 2019 | 1:41 PM

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Sharad Pawar Press conference after Ajit Pawar oath) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रात रातोरात राजकीय भूकंप पाहायला मिळाला.

..त्यांना पाडण्याची जबाबदारी आमची : शरद पवार
Follow us on

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Sharad Pawar Press conference after Ajit Pawar oath) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रात रातोरात राजकीय भूकंप पाहायला मिळाला.  भल्या पहाटे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांना (Sharad Pawar Press conference after Ajit Pawar oath) शपथही देण्यात आली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र शरद पवार यांनी हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं स्पष्ट केलं.

या सर्व घडामोडीनंतर शरद पवार यांनी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

अजित पवारांचा निर्णय शिस्तभंगाची कारवाई करावी असा निर्णय आहे. अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

..त्यांना पाडण्याची जबाबदारी आमची – शरद पवार

यावेळी शरद पवारांनी पक्षाविरोधात जाणाऱ्यांना रोखठोक इशारा दिला. शरद पवार म्हणाले, जे काही सदस्य गेले आहेत आणि जे जाणार असतील त्यांना हे माहिती असावं की आपल्याकडं पक्षांतरबंदी कायदा आहे. त्यामुळे त्यांचं सर्व विधीमंडळ सदस्य जाण्याची शक्यता आहे. जनमानस पाहता राज्याचा सर्वसामान्य माणूस यांना कधीही पाठिंबा देणार नाही. त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुकांचा निर्णय घेतला तर आम्ही तिन्ही पक्ष त्यांचा निवडणुकीत पराभव करण्याची आमची जबाबदारी आहे”.

उद्धव ठाकरे काय म्हणाले

देशात लोकशाहीच्या नावाने जो कारभार सुरु आहे तो चुकीचा आहे. जे नवं हिंदुत्व आलं आहे त्याचं हे काम आहे. शिवसेना जे करते ते उघड करते, ते आमदार फोडून करतात. बिहारमध्ये त्यांनी लालू आणि नितीशचं सरकार फोडलं आणि सरकार पाडलं.  त्यांच्या मीपणाबद्दल ही लढाई आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पाठीवर वार केल्यावर महाराजांनी काय केलं होतं ते त्यांनी समजून घ्यावं.

राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहाटे बैठक झाली होती. हे असं झालं जसं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करायचं होतं. यापुढे जे होईल ते कायद्यानुसार संविधानानुसार होईल.

संबंधित बातम्या  

अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल : शरद पवार