शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; धनुष्यबाण चिन्हासाठी….

| Updated on: Oct 03, 2022 | 6:33 PM

वर्षा निवासस्थानी सध्या शिंदे गटाच्या लीगल टीमची महत्वाची बैठक.

शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; धनुष्यबाण चिन्हासाठी....
Follow us on

मुंबई :  अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, या निवडणुकीच्या माध्यामतून शिंदे गट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. वर्षा निवासस्थानी सध्या शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक सुरु आहे.

धनुष्यबाण चिन्हासाठी लढा देण्याबाबत या बैठकीत चर्चा होत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना धनुष्यबाण मिळू नये यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीआधी धनुष्यबाण चिन्हावर फैसला? व्हावा असे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहेत. शिसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.

पोटनिवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अंधेरी पोट निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईत पहिली आरपारची लढाई होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर अंधेरीत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेना आणि शिंदे गट-भाजप यांच्यात लढत होणार आहे.

भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.