Shiv Sena BJP Government: राज्यातलं नवं सरकार शिवसेना आणि भाजपाचं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ वक्तव्य

| Updated on: Jul 02, 2022 | 11:13 PM

सुरत, गुवाहाटी, गोवा असा 11 दिवसांचा प्रवास करुन एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. ताज हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक झाली. शिंदे आणि फडणवीस यांनी आमदारांना संबोधित केले. राज्यातलं नवं सरकार शिवसेना आणि भाजपाचं असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Shiv Sena BJP Government: राज्यातलं नवं सरकार शिवसेना आणि भाजपाचं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ वक्तव्य
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : राज्यातील नवे सरकार हे शिवसेना आणि भाजपाचे आहे(Shiv Sena BJP Government).  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक(Eknath Shinde) आणि भाजपा आमदारांच्या एकत्र बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यामुळे ही शिवसेना नेमकी कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे गटाची? अशी चर्चा रंगली आहे.

सुरत, गुवाहाटी, गोवा असा 11 दिवसांचा प्रवास करुन एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. ताज हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक झाली. शिंदे आणि फडणवीस यांनी आमदारांना संबोधित केले. राज्यातलं नवं सरकार शिवसेना आणि भाजपाचं असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सत्ताधाऱ्यांकडे 166 जणांचे संख्याबळ असल्याचा दावा

कायदेशीर बाजू भक्कम असल्याने उद्या सभागृहात लढली जाईल. असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. उद्याच्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड होणार आहे. ती व्यवस्थित होईल, असे राम कदम यांनी सांगितले आहे. सत्ताधाऱ्यांकडे 166 जणांचे संख्याबळ असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कुठलीही नाराजी या बैठकीत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार

मुंबई- आजच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सध्या युतीकडे १७० पेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच या निवडणुकीत व्हीप लागू होत नसतो, तसेच या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदारही युतीच्या विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने असतील असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेवर दावा करू शकत नाहीत

दरम्यान एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेवर दावा करू शकत नाहीत. शिंदे यांना पक्ष विलीन करण्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया लोकसभा माजी सचिव PDT आचार्य यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना आपणच मूळ शिवसेना आहोत असा दावा करता येणार नाही असेही आचार्य म्हणाले. शिंदे यांची याचिका ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट काय निर्णय घेणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना म्हणते आमचा, शिंदे म्हणतात आमचा, पवार काय म्हणतात? नियमांनुसार व्हीप नेमका कुणाचा लागू होणार?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde)सरकारची पहिलीच परीक्षा ठरणारे पहिले विशेष अधिवेशन उद्यापासून दोन दिवस मुंबईत पार पडणार आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker)निवड करण्यात येणार आहे. आता या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन व्हीप लागू होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आघाडीचे महाविकास उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप काढण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद भारत गोगावले हेही शिंदे – फडणवीस सरकारचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असा व्हीप जारी करण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही शिवसेनेच्या वादात कायदेशीरदृष्ट्या व्हीप नेमका कुणाचा लागू होँणार, हा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाने अधिकृतरित्या काढलेला व्हीप पाळावाच लागेल, असे सांगितले आहे. जर व्हीप पक्षाच्या उमेदवारांनी पाळला नाही तर त्यांच्यावर अपत्राततेची कारवाई होऊ शकते. मात्र उद्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार, यावर सगळे ठरणार असल्याचे सांगितले जाते आहे.