Video : ‘आखिरी साँस तक ठाकरे साहाब के साथ’ मातोश्रीवर मुस्लिम शिवसैनिक दाखल

| Updated on: Oct 05, 2022 | 9:15 AM

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शनाला सुरुवात, मोठ्या संख्येनं शिवसैनिक मातोश्रीवर दाखल

Video : आखिरी साँस तक ठाकरे साहाब के साथ मातोश्रीवर मुस्लिम शिवसैनिक दाखल
अजिज मोमीन, मुस्लिम शिवसैनिक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई : मुंबईत आज संध्याकाळी दसरा मेळावा (Dussehra Melava)  पार पडेल. बीकेसी विरुद्ध शिवतीर्थ (BKC vs Shivaji Park) असा दसरा मेळाव्याचा संघर्ष आज पाहायला मिळणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. दसरा मेळाव्यासाठी शक्तिप्रदर्शन तर केलं जाईलच. बॅनरबाजीने या शक्तिप्रदर्शनाला सुरुवातही केलीय. पण त्याआधी कार्यकर्त्यांकडूनही आपली निष्ठा दाखवण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत. मातोश्रीवर (Matoshree Uddhav Thackeray) आज सकाळी काही शिवसैनिक जमले होते. यावेळी आलेल्या मुस्लिम शिवसैनिकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

अजीज मोमीन हे नगर जिल्ह्यातील संमगनेर येथून मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आलेत. त्यांनी थेट मातोश्री गाठली. रक्ताने लिहिलेला बॅनर घेऊन अजीज मोमीन यांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनात घोषणा दिल्या. आखिरी साँस तर उद्धव ठाकरे साहाब के साथ रहूँगा, असं लिहिलेला बॅनर अजीज मोमीन घेऊन आलेत.

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांना या मुस्लिम शिवसैनिकाने खडेबोले सुनावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती, याची आठवणही त्यांनी बंडखोरांना करुन दिली. दरम्यान उद्धव ठाकरे हे परमनंट मुख्यमंत्री असल्याचंही ते म्हणाले. अजीज मोमीन यांच्याप्रमाणे असंख्य जण आज आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा दाखवण्यासाठी मुंबईत दाखल झालेत.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

आज शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तर बीकेसीवर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होईल. या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झालीय. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य राजकीय संघर्ष लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय.

दसरा मेळाव्यासाठीची तयारीही अंतिम टप्प्यात आलीय. ट्रेन, एसटी बस, खासगी बस आणि खासगी गाड्या, अशा वेगवेगळ्या मार्गांनी शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. संध्याकाळी होणाऱ्या दसरा मेळाव्यात कोण काय बोललं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागलीय.