फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची?, अग्रलेखातून राऊतांची मोदींना विचारणा

| Updated on: Aug 16, 2021 | 7:31 AM

फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर 'चिंतन' झालं असतं तर बरं झालं असतं, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची?, अग्रलेखातून राऊतांची मोदींना विचारणा
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर ‘चिंतन’ झालं असतं तर बरं झालं असतं, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर केली आहे. फाळणीच्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बीजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

विभाजन हे राजकारणाचा भाग किंवा खुशीखुशीने झालेले नाही

ज्या इक्बालने पुढे पाकिस्तान निर्मितीला मोठा हातभार लावला त्यानेच, ”सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा” असे अजरामर काव्य लिहिले. बॅ. जीना हेसुद्धा स्वातंत्र्यलढ्याचे एक शिलेदार होते व ते जहालपंथी टिळकांचे चाहते होते. न्या. गोखले हे जसे गांधींचे गुरु तसे जीनांचेही गुरु होते. इंग्रजांच्या बेड्यांतून देशाला मुक्त करणे हाच सगळ्यांचा ध्यास होता, पण जसजसे स्वातंत्र्य जवळ येऊ लागले तसतसे हिंदू-मुसलमानांचे झगडे सुरु झाले व त्याचा शेवट द्विराष्ट्र निर्मितीत झाला, पण विभाजन हे काही राजकारणाचा भाग किंवा खुशीखुशीने झालेले नाही. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ या नीतीतूनच फाळणी झाली व आपल्या स्वातंत्र्याची ती अपरिहार्यता ठरली.

इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली

इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे. कश्मीरातून विस्थापित झालेल्या पंडितांना त्यांचा हक्क व खोऱ्यातली घरे परत मिळाली तरी बरेच काही साध्य होईल . फाळणीच्या वेदनेइतकेच कश्मिरी पंडितांच्या जखमांचे क्रणही देशाला अस्वस्थ करीत आहे.

ही आग कशी विझवणार?

फाळणीच्या वेदनेचा दाह फक्त ‘उक्ती’ ने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष ‘कृती’ देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो, पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार?

पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस एक घोषणा केली, ही घोषणा काय?, पंतप्रधानांनी फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आपले पंतप्रधान मोदी यांनी केली. देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना मोदी यांना फाळणीच्या वेदनेने अस्वस्थ केले व त्यांनी त्या कटू आठवणींना उजाळा दिला. फाळणी झाली. भारत-पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही समाजांनी रक्त सांडले.

फाळणी मान्य करण्यात काँग्रेसच्या नेत्यांकडे अनेक कारणं होती

मुस्लिम लीगने धर्माधिष्ठीत द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करून पाकिस्तान या इस्लामी राष्ट्राची स्थापना केली. द्विराष्ट्रवादाचे बीज सर सय्यद अहमद यांच्यापासूनच रुजले होते. हिंदू व मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, हा सर सय्यद यांचा सिद्धांत होता. मुस्लिम लीगने त्याचा आश्रय घेतला. फाळणी मान्य करण्यात काँग्रेसच्या नेत्यांची जी अनेक कारणे होती त्यात फाळणीमुळे हिंदू-मुसलमानांचा प्रश्न मिटेल हे एक कारण होते. अर्थात फाळणीमुळे हिंदू-मुसलमान प्रश्न सुटला नाही.

वेदनेची ठसठस 75 वर्षांनंतरही कायम

पाकिस्तानने हिंदू निर्वासित पाठविण्याचे सत्र सुरुच ठेवले. भारतातून रेल्वे गाड्यांतून मुसलमान लाहोर-कराचीत जात होते. त्या रिकाम्या गाड्यांतून कत्तली झालेल्या हिंदूंचे मृतदेह पाठविण्यापर्यंत क्रौर्य टोकाला गेले. लाखांत स्त्रियांवर बलात्कार झाले. घर-संसार, नाती-गोती उद्ध्वस्त झाली. अफगाणिस्तानातील आताच्या तालिबानी हिंसेला मागे टाकणारे प्रकार त्यावेळी फाळणीदरम्यान झाले. भारताच्या पारतंत्र्याचा अंत हा असा रक्तरंजित ठरला व त्या वेदनेची ठसठस 75 वर्षांनंतरही कायम आहे.

फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची?

देश दुभंगला तशी मने दुभंगली ती कायमचीच. ही दुभंगलेली मने दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला ‘बस’ घेऊन गेले. तसे सध्याचे पंतप्रधान मोदी हेसुद्धा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. म्हणजे दोन देशांतली फाळणीची वेदना संपावी आणि नवे पर्व सुरु व्हावे, असा विचार मोदींच्याही मनात होताच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवूया व त्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस निवडला. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर ‘चिंतन’ झाले असते तर बरे झाले असते. मुळात स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस व समाजवादी चळवळीतले काही लोक होते.

फाळणीच्या वेदना जागवताना त्या वेदना भोगलेला महानायक कोण आहे?

वीर सावरकरांसारखे प्रखर हिंदुत्ववादी हे द्विराष्ट्र सिद्धांताचाच पुरस्कार करीत होते. हिंदू महासभा त्याच विचारांची होती. भाजप, जनसंघाचा त्यावेळी उदयही झाला नव्हता. भारतीय जनता पक्षाचे लालकृष्ण आडवाणी हे एकमेव नेते फाळणीच्या वेदनेचे साक्षीदार आहेत. त्यांनी त्या काळात जे भोगले ते त्यांच्या पुढच्या प्रवासात अनेकदा उफाळून आले, पण फाळणीच्या वेदना जागवताना त्या वेदना भोगलेला महानायक कोण आहे? फाळणीवर उतारा म्हणून भाजपने पाकव्याप्त कश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड भारताचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता, पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचे राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या.

फाळणीच्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बीजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवं

फाळणीच्या वेदनेचा दाह फक्त ‘उक्ती’ने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष ‘कृती’देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो, पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार?

(Shivsena Sanjay Raut Criticized Narendra Modi Over 14 August partition horrors remembrance day)

हे ही वाचा :

बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल, जयंत पाटलांचा इशारा; गोपीचंद पडळकर मात्र ठाम

‘तुम्ही नारळ फोडत राहा, उमेदवारी मला मिळो’, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी