Shivsena | एकदा नाय 100 वेळा गद्दार म्हणेन, हात तर लावून दाखव, सोलापूरच्या अतुल भवर यांचं संतोष बांगरांना आव्हान

| Updated on: Jul 18, 2022 | 4:54 PM

मी फक्त सोलापुरातच नाही तर महाराष्ट्रात कुठेही मला बोलव मी तिथे येतो... महाराष्ट्रात लाखो शिवसैनिक जागे होत आहेत. त्यांनी इमान सोडलेले नाही, असा इशारा अतुल भवर यांनी दिला आहे.

Shivsena | एकदा नाय 100 वेळा गद्दार म्हणेन, हात तर लावून दाखव, सोलापूरच्या अतुल भवर यांचं संतोष बांगरांना आव्हान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर : खबरदार आम्हाला गद्दार म्हणालात तर… असा इशारा देणाऱ्या संतोष बांगर यांना सोलापुरच्या शिवसैनिकानं प्रति आव्हान दिलं आहे. सोलापूर शिवसेना नेते अतुल भवर (Atul Bhavar) यांनी संतोष बांगर (santosh Bangar) यांनाच इशारा दिला आहे. एकदा नाही तर हजार वेळा तुला गद्दार म्हणेन. मला हात तर लावून दाखल. शिवसेनेला (Shivsena) आव्हान देणारी औलाद हिंदुस्थानात अजून जन्मली नाही. तू जर मर्द असशील तर मी हजार मेळा तुला गद्दार म्हणतो. हिंमत असेल तर हात लावून दाखव, असा इशारा अतुल भवर यांनी दिला आहे. संतोष बांगर यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनीही आमदार बांगर यांना सुनावले होते. हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारून दाखवावीच, असं आवाहन त्यांनी दिलं आहे. संतोष बांगर यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया येत आहे. त्यात आज सोलापूर शिवसेना नेत्यानेही त्यांना आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले अतुल भवर?

सोलापूर शिवसेना नेते अतुल भवर म्हणाले, ‘ मुळात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद हिंदुस्थानात जन्मली नाही. संतोष बांगर हे गद्दार आहेत. त्यांच्या तोंडून ही भाषा अशोभनीय आहे. त्यांना माझं उघड आव्हान आहे. तू जर खरच मर्द असेल तर मी हजार वेळा गद्दार म्हणतो. हिंमत असेल तर तू अतुल भवरला हात लावून दाखव. शिवसेनेला आव्हान देणारी अवलाद या हिंदुस्थानात जन्मलेली नाही. – संतोष बांगर हा एक गद्दार आहे गद्दार. त्या गद्दाराच्या तोंडून अशी भाषा अशोभनीय आहे. 2019 साली उद्धव साहेबांनी मातोश्रीवर बोलवून त्याला तिकीट दिलं. तो या गद्दारांच्या गटात सामील झालाय. त्या मातोश्रीशी बांगरने गद्दारी केली. संतोष बांगरला माझं खुलं आव्हान आहे. तुला एकदा नाही शंभर वेळा गद्दार म्हणणार.. संतोष बांगर तू जर मर्द असशील, तुझ्यात दम असेल तर या अतूल भावरला हात लावून दाखव.. मी फक्त सोलापुरातच नाही तर महाराष्ट्रात कुठेही मला बोलव मी तिथे येतो… महाराष्ट्रात लाखो शिवसैनिक जागे होत आहेत. त्यांनी इमान सोडलेले नाही. ज्या शिवसैनिकांनी बांगर सारख्या लोकांना आमदार केले. रस्त्यावरून उचलून आमदार केले. मोठी पद मिळवून दिली. त्या शिवसैनिकांना मारण्याची भाषा करणारे हे कोण? संतोष बांगरमध्ये जर हिम्मत असेल तर एका शिवसैनिकाच्या केसाला हात दाखवावे. जे बाहेरून चार-पाच ठिकाणाहून आलेले लोक आहेत ते या गटामध्ये सामील झालेले आहेत. जो बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा आणि मातोश्रीशी इमान राखणारा शिवसैनिक गेलेला नाही.

अयोध्य पौळ यांचंही बांगरांना आव्हान

आम्हाला गद्दार म्हणायचं नाही, असं वक्तव्य करणाऱ्या संतोष बांगर यांना शिवसेनेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनीही इशारा दिलाय. आमचे शिवसैनिक तिथे जाऊन बांगर यांच्या कानाखाली आवाज काढतील. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जेवढं ओळखते, ते असं लोकांच्या पाठित खंजीर खुपसणारे नाहीत. मला केवळ बांगर यांच्याकडून धमत्या आलेल्या नाही तर मला स्थानिक पातळीवरूनही धमक्या आल्या आहेत, अशी माहिती अयोध्या पौळ यांनी दिली.

संतोष बांगर कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या ताफ्यात अगदी शेवटी सामिल झालेले आमदार म्हणजे संतोष बांगर. हिंगोली कळमनुरी येथील मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. शिंदे गटातील आमदारांनी बंड पुकारल्यानंतर संतोष बांगर यांनी हिंगोलीत शिवसैनिकांची मोठी रॅली काढून शिंदेंना शिवसेनेत येण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बहुमत चाचणीवेळी बांगर हे स्वतः शिंदे गटात शामिल झाले व त्यांच्या बाजूने मतदानही केले. त्यानंतर मागील आठवड्यात बांगर यांनी हिंगोली ते मुंबई अशी मोठी रॅली काढत मुंबई एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला व तेथे मोठे शक्तिप्रदर्शन केले.