रितसर वर्गणी भरुन राष्ट्रवादी सोडली; शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची फटकेबाजी

| Updated on: Jun 25, 2022 | 9:26 PM

घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. रितसर वर्गणी भरुन राष्ट्रवादी सोडली असं म्हणत शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांनी दमदार फटकेबाजी केली. शिवसेनेच्या यशाचं रस्हय हे नेतृत्व उद्धव ठाकरेंना जाते. बंडखोरांच्या कारवाईबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

रितसर वर्गणी भरुन राष्ट्रवादी सोडली; शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची फटकेबाजी
भास्कर जाधव रस्त्यांची दु
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची बंडखोरी मोडून तोडून टाकण्यासाठी आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackray) स्वत: मैदानात उतरले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचा निर्धार जाधव यांनी व्यक्त केला.

घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. रितसर वर्गणी भरुन राष्ट्रवादी सोडली असं म्हणत शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांनी दमदार फटकेबाजी केली. शिवसेनेच्या यशाचं रस्हय हे नेतृत्व उद्धव ठाकरेंना जाते. बंडखोरांच्या कारवाईबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना सुनावलं

ज्यावेळी माझी निवड करण्यात आली त्यावेळी बाळासाहेबांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारलं होतं. ही आठवण त्यांनी आज कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितलं. मी त्यांचा मुलगा आहे, मला पदं दिलं नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. तसेच बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मला प्रेम लाभलं आहे. शिवसैनिक माझ्यावर अधिक प्रेम करतील असंही त्यांनी सांगितलं. बंडखोर आमदारांना त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या. बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत.

संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार कुणालाही नाही असा संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा. आज सहा ठराव मंजूर केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही पुढच्या सर्व निवडणुका लढणार आहोत. सर्व सदस्यांनी मिळून काही कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणारे ठराव मंजूर झाले आहेत. त्यातले दोन ठराव अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातला पाचवा ठरवा असा आहे की, शिवसेना ही फक्त बाळासाहेब ठाकरेंची आहे. आणि ती तशीच राहिल. बाळासाहेबांच्या विचाराशी कधी प्रतारणा झाली नाही आणि होणार नाही. मराठी अस्मितेचा हा विचार आहे. पुढचा ठराव असा आहे की ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी हा ठराव मंजूर झाला. त्यानुसार त्यांच्याव कारवाई होईल. सहाव्या ठरावात आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं नाव कुठल्याही संघटनेला वापरता येणार नाही. अशा प्रकारे कुठलाही गद्दार त्यांच्या नावाचा वापर करू शकत नाही. तर तुम्हाला मतं मागयची आहेत. ती तुमच्या बापाच्या नावाने मागा. दुसऱ्याच्या बापाच्या नावाने मागू नका कारावाईबाबत तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळेल. मंत्रिपदावर कोण राहतंय. शिवसेनेच्या पदावर कोण राहतंय हेही कळेल.