EKnath Shinde vs Uddhav Thackery : बंडखोरीची ‘सुप्रीम’ सुनावणी! शिंदे गट पत्रकाद्वारे जाहीर करणार भूमिका, नवा गट स्थापणार?

| Updated on: Jun 27, 2022 | 8:51 AM

शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे मांडणार आहेत. तर सरकारकडून सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत.

EKnath Shinde vs Uddhav Thackery : बंडखोरीची सुप्रीम सुनावणी! शिंदे गट पत्रकाद्वारे जाहीर करणार भूमिका, नवा गट स्थापणार?
ठाकरे विरुद्ध शिंदे
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  आजचा दिवस एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जातोय. महाराष्ट्रातील राजकीय राडा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला असून अवघ्या देशाच्या नजरा महाराष्ट्रावर लागल्या आहेत. आज कोर्टात सुनावणी असल्यानं एकनाथ शिंदे गटासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे गटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी त्या 16 आमदारांना नोटीस बजावत दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. आमदार निलंबन आणि गटनेता कारवाईविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाच्या याचिकेविरोधात शिवसेनेनंही उत्तर देण्याची तयारी केलीय. दरम्यान, पत्रकाद्वारे शिंदे गट आपली भूमिका जाहीर करणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गट पत्रकाद्वारे भूमिका मांडणार

शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. तर दुसरीकडे आमचा गटच शिवसेनेचा असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय. यामुळे आता निर्णय कुणाच्या बाजूनं लागतो ते पाहणं महत्वाचं ठरेल. दरम्यान, पत्रकाद्वारे शिंदे गट आपली भूमिका मांडणार आहे.

आजच्या निर्णयाकडे लक्ष

शिवसेनेकडून जोरदार तयारी

शिवसेनेकडून देखील विधीज्ञांचा सल्ला घेतला जातोय. राजकीय पक्षाला व्हिप जारी करण्याचे अधिकार असल्याचं रवीशंकर जंध्याल यांनी सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयात वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदा आता 16 आमदारांवर कारवाई होणार की, बंडखोर नेत्यांच्या बाजूने न्यायालय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं.

शिंदे गट, शिवसेनेची बाजू कोण मांडणार?

शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे मांडणार आहेत. तर सरकारकडून सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत.