महाप्रसाद देण्याची भाषा करणाऱ्यांनी Ambulance पण आणली! लोकं म्हणाले ही तर सोनियासेना

| Updated on: Apr 23, 2022 | 2:30 PM

हनुमान चालिसाच्या वाचनावरून मुंबईत (Mumbai) वाद पेटला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचा वाचन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर परिस्थिती पुर्णपणे बिघडली आहे. नवनीत राणा या सकाळी 9 वाजता हनुमान चाळीसा वाचणार असल्याचं शुक्रवारी त्यांनी म्हटलं होतं.

महाप्रसाद देण्याची भाषा करणाऱ्यांनी Ambulance पण आणली! लोकं म्हणाले ही तर सोनियासेना
महाप्रसाद देण्याची भाषा करणाऱ्यांनी Ambulance पण आणली!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – हनुमान चालिसाच्या वाचनावरून मुंबईत (Mumbai) वाद पेटला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचा वाचन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर परिस्थिती पुर्णपणे बिघडली आहे. नवनीत राणा या सकाळी 9 वाजता हनुमान चाळीसा वाचणार असल्याचं शुक्रवारी त्यांनी म्हटलं होतं. त्यापूर्वीच त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राणा दाम्पत्याच्या घरासमोर एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने अॅम्ब्युलन्स आणली आहे. त्यावर बसून काही कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. अॅम्ब्युलन्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर मजेशीर कमेंट देखील आल्या आहेत.


बंटी बबलीची घंटी वाजवून सोडा – नेटकरी

बंटी बबलीला जास्त खाऊन काय झुलाब झालं तर दवाखान्यात घेऊन जाण्याासाठी अॅम्ब्युलन्स आणली आहे. अकरा वाजले आहेत तरीपण त्या खाली उतरू शकलेल्या नाहीत. मी तर त्यांच्या स्वागतासाठी इंथ थांबलो होतो. परंतु त्या काही इथं आल्या नाहीत. आम्ही सुध्दा इथेच थांबणार आहोत अशी प्रतिक्रिया अॅम्ब्युलन्समध्ये बसलेल्या शिवसैनिकांनी दिली आहे. सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका नेटकरी चक्क सोनियासेना म्हणाला आहे. तर दुसरा म्हणतो तुम्हाला सगळ्यांना कामाला लावलं ओ बंटी आणि बबलीनं. बंटी बबलीची घंटी वाजवून सोडा असंही नेटकरी म्हणत आहे.

मातोश्री बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे

खार परिसरातील खासदार नवनीत राणा यांच्या घराबाहेर हा गोंधळ सुरू आहे. नवनीत यांचे पती रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत, दोघांनीही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. नोटीस मिळाल्यानंतरही नवनीत राणा हनुमान चालिसाच्या पठणावर ठाम आहेत.याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीसही बजावली आहे. राणा दाम्पत्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.तसेच अमरावती येथील आपल्या घरावर हल्ला झाल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या घरी मुलं आहेत आणि त्यांना काहीही झालं तर त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

Pravin Darekar: आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचाल तर भाजप स्वस्थ बसणार नाही; प्रवीण दरेकर यांचा इशारा

Pune crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं पुण्यातल्या बावधनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधम रिक्षाचालक फरार

Nashik Accident : बुलडाणा, बीडनंतर आता नाशकात भीषण अपघात! वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो उलटला, 13 जण जखमी