दसरा मेळाव्याला दीड लाखांची गर्दी जमवण्याचं शिवसेनेचं टार्गेट; एकनाथ शिंदेनी 3 लाख लोकांची गर्दी जमवणार

| Updated on: Sep 28, 2022 | 7:16 PM

जास्तीत जास्त गर्दी जमवून दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार प्लानिंग सुरु केले आहे.

दसरा मेळाव्याला दीड लाखांची गर्दी जमवण्याचं शिवसेनेचं टार्गेट; एकनाथ शिंदेनी 3 लाख लोकांची गर्दी जमवणार
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात दसरा मेळाव्याला(Shivsena Dasara Melava 2022) गर्दी जमवण्यावरुन जोरदार चुरस निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त गर्दी जमवून दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार प्लानिंग सुरु केले आहे. शिवतीर्थावर मेळाव्याला दीड लाखांची गर्दी जमवण्याचं शिवसेनेचं टार्गेट आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले 3 लाखांची गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले आहे.

दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जय्यत तयारी सुरु आहे. शिवतीर्थावर मेळाव्याला दीड लाखांची गर्दी जमवण्याचं शिवसेनेचं टार्गेट आहे.

दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. शिवसैनिकांची गर्दी जमवण्याची जबाबदारी राज्यातील जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे.

अशी आहे शिवसेनेची तयारी

  1. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून पदाधिकारी,शाखा प्रमुख,जिल्हा प्रमुखांवर विशेष जबाबदारी
  2. मुंबईत 227 वॉर्डातील शाखाप्रमुखांना प्रत्येकी 3ते 4 बस घेऊ येण्याचे निर्देश
  3. उद्धव ठाकरेंच्या भाषणासाठी विशेष स्क्रीन लावणार
  4. शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट असणार
  5. औरंगाबादमधून 20 हजार लोक आणण्याचं ठाकरेंचं टार्गेट

अशी आहे शिंदे गटाची तयारी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गरवारे क्लबमध्ये शिंदे गटातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकाथ शिंदे यांनी 3 लाखाची गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले आहे.

  1. शिंदे गटाकडून मंत्री, आमदारांवर दसरा मेळाव्याची जबाबदारी
  2. सोलापुरातून 25 हजार जणांना आणण्याचं शिंदे गटाचं टार्गेट
  3. लोकल आणि बसने शिंदे गटाचे कार्यकरते दसरा मेळाव्यासाठी येणार
  4. दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून युवा सेनेला चार हजार लोक आणण्याचे टार्गेट

ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसे मैदानावर होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही गटाचे मेळावे होणार असल्याने आता गर्दी जमवण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे.