उद्धव ठाकरे याचे भाजपला आव्हान; म्हणाले, “तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही…”

| Updated on: Jan 23, 2023 | 8:01 PM

मोदीचे माणसं मग, चेहरा बाळासाहेबांचा का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला. हिंमत असेल तर मोदी यांच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या, असं आव्हानं उद्धव ठाकरे यांनी दिलं.

उद्धव ठाकरे याचे भाजपला आव्हान; म्हणाले, तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही...
उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल तरीही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मत मिळू शकत नाही. हे तुम्ही मान्य केलेले आहात. हे मोदी यांनासुद्धा मान्य करावं लागलं आहे. मोदीचे माणसं मग, चेहरा बाळासाहेबांचा का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला. हिंमत असेल तर मोदी यांच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या, असं आव्हानं उद्धव ठाकरे यांनी दिलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनामित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

आपली महाविकास आघाडीचे सरकार असताना का पाडलं. माझ्यावर आरोप केला गेला की, हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहारी गेले. काल सांगत होते. शरद पवार खूप गोड माणूस आहे. मी फोनवरून त्यांचे मार्गदर्शन घेत असतो. मग, मी काय घेत होतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

…तर हेही उद्या भाजपत जातील

संजय तुला पोलंडचा पंतप्रधान भेटला. मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. मला म्हणाले की, मी आज इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर रेड पडली. कागदपत्रे सापडली, अशी बातमी ऐकलीय. मग लगेच आपल्या इथल्या खोकेवीरांनी सांगितलं की, अरे तू कसं जगणार? न झोपेचा पत्ता, न कसलं काही.

भाजपात ये किंवा मिंध्ये गटात ये, बघ सगळं मस्त. हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं आहे. त्यामुळे उद्या कदाचित बातमी येण्याची शक्यता आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजप किंवा मिंध्ये गटात गेले, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत

आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले एकत्र आले होते. पण त्यानंतर ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघं नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही. कारण देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे, असा घणाघातही त्यांनी केला.