काय आहे नेमकं अमरावतीचं प्रकरण? यशोमती ठाकूर, नवनीत राणा आक्रमक; गृहमंत्री आमित शहांनी दिले NIA चौकशीचे आदेश

| Updated on: Jul 02, 2022 | 5:45 PM

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्या हत्येमागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याचा देखील तपास करण्यात येत आहे. कारण मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली असा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपाचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.

काय आहे नेमकं अमरावतीचं प्रकरण? यशोमती ठाकूर, नवनीत राणा आक्रमक; गृहमंत्री आमित शहांनी दिले NIA चौकशीचे आदेश
Follow us on

अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.  हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. गृहमंत्री आमित(Amit Shah) शहा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. शहा यांनी या प्रकरणाची  NIA चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर( Yashomati Thakur) यांच्यासह खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी आक्रमक प्रतिक्रिया देश या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्या हत्येमागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याचा देखील तपास करण्यात येत आहे. कारण मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली असा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपाचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.

एनआयएकडून चौकशीला सुरुवात

या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक अमरावती शहरात दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केलेली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एनआयए पथकाने पोलिसांकडून घटनेची सखोल माहिती घेतली असून, आरोपीची सुद्धा झाडाझडती घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हे हत्या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यशोमती ठाकूर यांचे ट्विट

अमरावती येथील हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास केला होता, या आरोपी आणि मारेकरी यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे ही पोलीसांनी सांगितलं होतं, तसंच हे संपूर्ण प्रकरण पोलिसांनीच शोधून काढलं आहे. काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा घटनांबाबत जी भावना व्यक्त केली ती ही आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. NIA ने या घटनेचा योग्य तपास करावा. माझं अमरावती आणि राज्यातील जनतेला आवाहन आहे की त्यांनी शांतता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण व्यक्त केले आहे तसंच उदयपूर च्या घटनेबाबत जे स्टींग ऑपरेशन समोर आले आहे ते पाहता अतिशय सावधपणे या घटनांकडे पाहिलं पाहिजे असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

खासदार नवनीत राणा यांचं अमित शाह यांना पत्र

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या प्ररकरणी अमित शाह यांना पत्र लिहीले आहे.  केमिस्ट ऊमेश कोल्हे यांची हत्या प्रकरणी पोलीस आयुक्तांवर कारवाईची  गणीनवणीत राणा यांनी  केली आहे. अमरावतीत कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून याला पोलीस आयुक्त आरती सिंह यांची चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.