विजय शिवतारे यांचा शरद पवारांवर खळबळजनक आरोप

| Updated on: Oct 09, 2022 | 9:16 PM

माजी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीते सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर खळबळजनक आरोप केला आहे.

विजय शिवतारे यांचा शरद पवारांवर खळबळजनक आरोप
Follow us on

मुंबई : माजी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीते सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर खळबळजनक आरोप केला आहे. पार्थ पवार विरोधात मी प्रचार केला. तो राग अजित पवार यांनी माझ्याविरोधात काढला. त्यांनी मला खूप त्रास दिला,राजकारण नाही तर उदयोगातही त्रास दिला असे शिवतारे म्हणाले.

निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो स्वागतार्ह असेल असे शरद पवार म्हणाले होते. पण आता ते वेगळीच प्रतिक्रिया देत आहेत.
40 आमदार आणि बारा खासदार हे सगळे फुटले. शिंदेंमुळे शिवसेनेची अवस्था झाली अशा प्रकारच्या अनेक वक्तव्य संपूर्ण काही नेते लोक करता आहेत.

2014 साली शरद पवारांना दोन प्रांतीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले. शिवसेनेला संपवण्याचा शरद पवारांचा कट होता.

यात शरद पवार यशस्वी झाले आहेत. शिवसेनेच्या अवस्थेला शरद पवार जबाबदार आहेत. शरद पवारांच्या नादी लागून उद्धव ठाकरेंनी 50 वर्षाची स्वाभिमानी शिवसेनेची संघटना शरद पवारांच्या वरचडीने लिहून ठेवली त्यांच्या दावणीला बांधली.

शरद पवार हे हे राज्यातल्या राजकारणातले बरमुडा ट्रँगल आहेत असा आरोपही शिवतारे यांनी केला.