ZP Election : पोटनिवडणुकीपूर्वी एकत्र, आता सर्वजण वेगळे, महाविकास आघाडीची फाटाफूट राज्यभर दिसणार?

| Updated on: Oct 04, 2021 | 10:10 AM

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14  आणि रिसोड,मालेगाव,कारंजा,वाशिम,मंगरुळपीर आणि मानोरा या 6 पंचायत समित्यांच्या 27 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान तर  6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. ही पोटनिवडणूक लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता होती.

ZP Election : पोटनिवडणुकीपूर्वी एकत्र, आता सर्वजण वेगळे, महाविकास आघाडीची फाटाफूट राज्यभर दिसणार?
वाशिम जिल्हा परिषद इमारत
Follow us on

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या 14  आणि रिसोड,मालेगाव,कारंजा,वाशिम,मंगरुळपीर आणि मानोरा या 6 पंचायत समित्यांच्या 27 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान तर  6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. ही पोटनिवडणूक लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र पोटनिवडणुकीत एकमत न झाल्याने सर्वच राजकीय राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्याने आता ही निवडणूक बहुरंगी होणार आहे. या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,भाजपा स्वतंत्र लढणार असून, वंचित आणि जनविकास आघाडी यांची युती झाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर कोरोनामुळे विकास कामे झाले नाहीत. त्यामुळं या पोटनिवडणुकीत मतदार राजा कोणाला पसंती देतो ते निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील महत्वाच्या सहा जिल्हा परिषद गटातील मुख्य लढती

1) काटा गटात शिवसेनेचे अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे यांच्या पत्नी ललिता खानझोडे उभ्या असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका देशमुख आणि काँग्रेसकडून संध्याताई देशमुख या मैदानात तआहेत. इथे थेट  तिरंगी लढत होणार आहे.

2) पार्डी टकमोर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे राजू चौधरी तर अपक्ष सरस्वती चौधरी यांच्यामध्ये लढत होणार आहे.

3) उकळी पेन गटामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी आणि वंचित चे दत्ता गोटे यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

4 ) आसेगाव सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची वंचितचे सुभाष राठोड यांच्यामध्ये चुरसीची लढत होणार आहे. त्यामुळं या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5) तळप बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे यांची काँग्रेसच्या रजनी गावंडे यांच्यात थेट लढत होणार आहे.

6) गोभणी सर्कलमध्ये बेबीताई ठाकरे शिवसेना ,रेखा उगले काँग्रेस,पूजा भुतेकर जनविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे…

तर रिसोड पंचायत समितीच्या सभापती गीता हरिमकर या पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

जिल्हा परिषदेतील रिक्त झालेल्या जागा

पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटातून वंचित बहूजन आघाडीचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3,भाजपा 2, जनविकास आघाडी 2 आणि काँग्रेस , शिवसेनेचा प्रत्येकी 1 असे व अपक्ष 1 सदस्य निवडून आले होते. मात्र ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने ह्या जागा रिक्त झाल्यात. त्यामुळं या सर्व जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत केवळ वंचित व जनविकास आघाडीची युती झाली आहे.तर राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेमध्ये जागांवरून मतभेद असल्यानं आघाडीत बिघाडी झाली असून त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे दिसत आहे.

ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वी वाशिम जिल्हा परिषदे मधील सदस्य संख्या

राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12, काँग्रेस 10, वंचित 8, भाजपा 7, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी 7, शिवसेना 6, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होतं. त्यात न्यायालयाच्या आदेशाने इतर मागास प्रवर्गाच्या 14 जागा रिक्त झाल्या असून वंचीत बहुजन आघाडीच्या चार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन , भाजप आणि जन विकास आघाडीच्या प्रत्येकी दोन, काँग्रेस व शिवसेनेची प्रत्येकी एक तर अपक्षाची एक जागा रिक्त झालेत त्यामुळं या जागेवर पोटनिवडणुकीला समोर जावं लागतं आहे.

महाविकास आघाडी आता वेगळी लढणार

वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली, मात्र पोट निवडणुकीच्या रिंगणात हे सर्व पक्षांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने पोट निवडणुकीच्या लढतीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 गटासाठी एकूण 82 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषद गट

1) काटा जिल्हा परिषद गटात एकूण 5 उमेदवार निवडणूक रिंगणात असून इथे पंचरंगी लढत होणार आहे.

2) पार्डी टकमोर जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 6 उमेदवार रिंगणात असून,सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.

3) उकळी पेन जिल्हा परिषद गटामध्ये 12 उमेदवार रिंगणात असून,शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी हे या लढतीत सामील आहेत.

कारंजा तालुक्यातील भामदेवी जिल्हा परिषद गटामध्ये 6 उमेदवार असून,सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहे.

मानोरा तालुक्यातील

1) कुपटा जिल्हा परिषद गटमध्ये 4 उमेदवार उभे असून,सर्वच पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत.

2) तळप जिल्हा परिषद गटामध्ये 4 उमेदवार उभे आहेत.

3) फुलउमरी जिल्हा परिषद गटामध्ये 3 उमेदवार उभे आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील

1) दाभा जिल्हा परिषद गटामध्ये 4 उमेदवार उभे आहेत.

2) कंझरा जिल्हा परिषद गटामध्ये 4 उमेदवार उभे आहेत.

3) आसेगाव जिल्हा परिषद गटा मध्ये 9 उमेदवार उभे आहेत.

मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे जिल्हा परिषद गटात 6 उमेदवार उभे आहेत.

रिसोड तालुक्यातील

1) कवठा जिल्हा परिषद गटामध्ये 3 उमेदवार उभे आहेत.

2) गोभणी जिल्हा परिषद गटामध्ये 3 उमेदवार उभे आहेत.

3) भर जहागीर जिल्हा परिषद गटामध्ये 4 उमेदवार उभे आहेत.

वाशिम जिल्ह्यातील एकूण 6 पंचायत समिती च्या 27 गणासाठी 135 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

कारंजा तालुक्यातील पंचायत समिती गण 

1 मोरगव्हाण 5

2 उंबर्डाबाजार 5

3 पोहा 5

4 धामणी खडी 3

मानोरा तालुक्यातील पंचायत समिती गण

5 धामणी 5

6 कोंडोली 7

7 गिरोली 6

8 शेंदुर्जना 6

मंगरुळपिर तालुक्यातील पंचायत समिती गण

9 पेडगाव 5

10 वनोजा 4

11 कासोळा 4

12 सनगाव 4

मालेगाव तालुक्यातील पंचायत समिती गण

13 मारसुळ 5

14 जऊळका 5

15 जोडगव्हाण 2

16 शिरपूर 3

17 खंड़ाळा शिंदे 4

रिसोड तालुक्यातील पंचायत समिती गण

18 कवठा बु 4

19 हराळ 3

20 वाकद 6

21 महागाव 3

22 मोप 6

वाशिम तालुक्यातील पंचायत समिती गण

23 फाळेगाव 5

24 कळंबा महाली 5

25 उकळीपेन 5

26 अनसिंग 8

27 पिंपळगाव 6

संबंधित बातम्या  

Washim ZP Election : वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीत पंचरंगी सामना, लढत कशी होणार? वाचा सविस्तर

Maharashtra ZP Election 2021: कोणत्या जिल्हा परिषदेत किती जागा, मिनी विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम