Nitin Gadkari : उद्वव ठाकरेंची खुर्ची जाणार? गडकरींनी पहिल्यांदाच मौन सोडलं आणि म्हणाले, ‘हा खेळ आहे!’

| Updated on: Jun 26, 2022 | 10:30 AM

राजकारण वेगळं असतं. पक्ष, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. राजकारण हे खेळासारखं आहे. सरकार बनतं तर, कधी बिघडतं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल. खेळात काहीही होऊ शकतं. तसंच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही.

Nitin Gadkari : उद्वव ठाकरेंची खुर्ची जाणार? गडकरींनी पहिल्यांदाच मौन सोडलं आणि म्हणाले, हा खेळ आहे!
नितीन गडकरी, उद्धव ठाकरे
Follow us on

नागपूर : मुंबई आणि गुवाहाटी येथून सत्तेसाठी पेचप्रसंग (Power Struggle) सुरू आहे. हा एकप्रकारे मुंबई-गुवाहाटी असा जाम आहे. हा कसा खुलेल, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना झी न्यूजच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी गडकरी म्हणाले, निसर्ग ( Nature) नियमानुसार, सर्व जागेवर जाम लागतो. त्यासाठी पारदर्शकता आणावी लागेल. स्वच्छता करावी लागेल. लवकरच हा जाम निघून जाईल, असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार का, यावर गडकरी म्हणाले, काय होत ते बघुया. हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. परिस्थिती सुरळीत होईल. उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली संकटाची परिस्थिती निघून जातील. अंधार निघून जाईल. सूर्य निघेल. सर्वकाही प्रकाशासारखं स्वच्छ होईल. राजकारण (Politics) हा एक खेळ आहे. खेळात काहीही होऊ शकतं, असंही ते म्हणाले.

राजकारण एक खेळ

नितीन गडकरी म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध चांगले आहेत. पण, राजकारण आणि वैयक्तिक संबंध यात फरक असतो. वैयक्तिक संबंध हे राजकारणाहून वेगळे असतात. मग, ते सरकारमध्ये असोत की नसोत. संबंध तेच राहतात. राजकारण वेगळं असतं. पक्ष, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. राजकारण हे खेळासारखं आहे. सरकार बनतं तर, कधी बिघडतं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल. खेळात काहीही होऊ शकतं. तसंच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही.

चालत राहणं हा निसर्गाचा नियम

माजी पंतप्रधान अटल बिहारी म्हणायचे, सरकार बनतात, बिघडतात. लोक येतात. जातात. पंतप्रधान येतात. बदलतात. पण, देश हाच राहतो. आपल्याला देशासाठी काम करायचं आहे. गाव, गरीब मजूर, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. आत्मनिर्भर देश तयार करायचं आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवायचं आहे. देशासाठी काम करायचं हीच आमची भावना आहे. कधी उन्ह असतं, कधी सावली असते. कधी चांगला रस्ता राहतो. कधी जाम होतो. चालत राहणे हाच निसर्गाचा नियम आहे. त्यासोबतच चालत राहावं लागेल. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं उत्तर नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तासंघर्षाबद्दल दिलं.

हे सुद्धा वाचा