ई-श्रम कार्ड: आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य ते पाल्याचं शिक्षण; जाणून घ्या एकाधिक लाभ

| Updated on: Dec 27, 2021 | 6:21 PM

कामगारांना नोंदणीनंतर ई-श्रम कार्ड उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांसहित अन्य योजनांचा लाभ कामगारांना घेणे शक्य ठरणार आहे. भविष्यातील कामगारकेंद्रित धोरणांची आखणी करताना सरकारला ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

ई-श्रम कार्ड: आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य ते पाल्याचं शिक्षण; जाणून घ्या एकाधिक लाभ
E-Shram Card
Follow us on

नवी दिल्ली- केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या माहिती संकलन मोहीम हाती घेतली आहे. ई-श्रम पोर्टलच्या मार्फत विविध वर्गवारीत कामगारांची माहिती संकलित केली जात आहे. आतापर्यंत कोट्यावधी कामरांनी पोर्टलवर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

कामगारांना नोंदणीनंतर ई-श्रम कार्ड उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांसहित अन्य योजनांचा लाभ कामगारांना घेणे शक्य ठरणार आहे. भविष्यातील कामगारकेंद्रित धोरणांची आखणी करताना सरकारला ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ई-श्रम पोर्टलवर अद्याप नोंदणी न केलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने केले जात आहे.

ई-श्रम कार्डचे विविध लाभ जाणून घ्या-

1. असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीदरम्यान किंवा भविष्यातील कार्यवाहीसाठी कोणत्याही प्रकारच्या शुल्क अदा करावे लागणार नाही. मात्र, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असणार आहे.

2. ई-श्रम पोर्टलचा महत्वाचा उद्देश कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षेत आणणे आहे. याद्वारे विविध आजारांसाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद देखील याद्वारे केली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे भविष्यात कामगारांना आरोग्य समस्यांच्या बाबतीत ई-श्रम कार्डच्या द्वारे आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध होतील.

3. व्यक्तिगत स्वरुपात कामगारांनाच नव्हे तर त्यांच्या पाल्यांना देखील लाभ योजनेतून मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कामगारांच्या आवाक्याबाहेर आहे. केंद्र सरकार विविध शैक्षणिक योजनांच्या कक्षेत ई-श्रम कार्ड धारकांना समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. तसेच गृहनिर्माणाच्या योजनांचा लाभही कामगारांना घेता येईल.

4. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाने मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटित क्षेत्रातील प्रत्येक तिसरा कामगार पोर्टलवर नोंदणी करीत आहे. ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीने केवळ चार महिन्यांत 14 कोटींचा टप्पा पार केला आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओरीसा आणि झारखंड या पाच राज्यांनी नोंदणीमध्ये आघाडी घेतल्याचे पोर्टलवरील माहितीतून स्पष्ट होते.

ई-श्रम कार्डसाठी कोण पात्र?

ई-श्राम पोर्टलवर नोंदणीसाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष लावण्यात आलेले नाहीत. केवळ कामगार हा आयकर भरणारा नसावा. 16 ते 59 वयोगटातील कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्राम पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र आहे. नोंदणीसाठी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, आधारशी जोडलेले बँक खाते यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. पोर्टलवर नोंदणी करण्यास इच्छुक कामगारांना मदत करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक – 14434 देखील दिलेला आहे. नंबर वर कॉल करून कामगार माहिती आणि प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात. पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती राज्य सरकारांच्या विभागांनाही देण्यात येत आहे.