World Consumer Day | जागो ग्राहक जागो! ग्राहक मंचात तक्रार कशी करायची? वाचा सविस्तर

| Updated on: Mar 15, 2021 | 1:56 PM

ग्राहक मंचाकडं एखादी तक्रार करायची असल्यास कुठे अर्ज करायचा हे माहिती असणं आवश्यक आहे. complaint under consumer right act

World Consumer Day | जागो ग्राहक जागो!  ग्राहक मंचात तक्रार कशी करायची? वाचा सविस्तर
जागतिक ग्राहक दिन
Follow us on

मुंबई: ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी भारतात ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा अंमलात आला आहे. या कायद्यांतर्गत कोणताही ग्राहक कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक व्यापाराची तक्रार करू शकतो, ज्यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं  ग्राहकांना एखादी तक्रार करायची असल्यास कुठे अर्ज करायचा हे माहिती असणं आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीनं देखील तक्रार नोंदवता येते. (World Consumer Day 2021 know how to file complaint under consumer right act)

महाराष्ट्रातील ग्राहकांना तक्रार करायची असल्यास प्रक्रिया कशी?

महाराष्ट्रात ग्राहक, संस्‍था नोंदणी अधिनियम‍, 1860 किंवा कंपनी अधिनियम, 1956 किंवा त्‍या त्‍या काळापुरत्‍या अमंलात असलेल्‍या अन्‍य कोणत्‍याही कायदयान्‍वये नोंदणी करण्‍यात आलेली कोणतीही ग्राहक स्‍वेच्‍छा संघटना, केंद्र सरकार राज्‍य शासने किंवा संघराज्‍य क्षेञ प्रशासने, एका ग्राहकास अधिक ग्राहकांच्‍या वतीने एकाच कारणासाठी तक्रार करता येते. तक्रारकर्ता ग्राहक स्‍वतः किंवा त्‍याचा अधिकृत प्रतिनीधी तक्रार दाखल करु शकतो.

तक्रारीत काय असाव?

ग्राहकाचं व्यापाऱ्याकडून कशा प्रकारे नुकसान झालं. खरेदी केलेल्या वस्तूतील दोष, सेवांमध्ये आढळलेल्या उणिवा, व्यापाऱ्यानं अधिक घेतलेली रक्कम याचा उल्लेख ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडं करायच्या तक्रारीत करता येते.

तक्रार कुठे करायची?

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत नुकसानभरपाई किती आहे त्यावरुन तक्रार कुठे करायची हे ठरवलं जाते.
20लाखापर्यंत असल्‍यास संबंधित जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, 20 लाख ते 100 लाख रुपयापर्यंत राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग,
100 लाख रुपयांहून अधिक राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, दिल्‍ली यांच्याकडे तक्रार करता येते. ग्राहकानं तो घेत असलेल्या सेवा आणि वस्तूमध्ये दोष, उणिवा आढळल्यास दोन वर्षांच्या कालवधीमध्ये तक्रार करता येते.

तक्रार कशी दाखल करायची?

ग्राहकांना तक्रार नोंदवायची असल्यास त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लेखी तक्रार प्रत्यक्ष किंवा टपालानं करता येते. ऑनलाईन पद्धतीनं तक्रार करायची असल्यास https://edaakhil.nic.in/edaakhil/ या वेबसाईटवर देखील तक्रार करता येते.

तक्रारीचं शुल्क

ग्राहकमंचाकडं तक्रार करायची असल्यास शुल्क देखील भरावं लागतं. 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई हवी असल्यास त्याबाबतचं शुल्क भरावं लागत नाही. 5 लाख ते 10 लाखापर्यंत 200 रुपये आहे. तर 10 लाख ते 20 लाखांपर्यंत 400 रुपये फी भरावी लागते. राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे 20 लाख ते 50 लाख रुपयांसाठी 2 हजार रुपये तर 50 लाख ते 1 कोटींपर्यंत 4 हजार तर राष्ट्रीय मंचाकडे तक्रार करायची असल्यास 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्यास 5 हजार रुपये शुल्क भरावं लागते.

संबंधित बातम्या:

World Consumer Day | का साजरा केला जातो ‘जागतिक ग्राहक दिन’? जाणून घ्या 2021 ची थीम

National Consumer Day | का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’? जाणून घ्या या मागची उद्दिष्टे…

(World Consumer Day 2021 know how to file complaint under consumer right act)