World Consumer Day | का साजरा केला जातो ‘जागतिक ग्राहक दिन’? जाणून घ्या 2021 ची थीम

| Updated on: Mar 15, 2021 | 1:15 PM

दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. World Consumer Rights Day

World Consumer Day | का साजरा केला जातो ‘जागतिक ग्राहक दिन’? जाणून घ्या 2021 ची थीम
ग्राहक
Follow us on

मुंबई: वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला. दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. तर भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. (World Consumer Rights Day 2021 why celebrate on 15 March know details)

जागतिक ग्राहक दिन

अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल भाषण केले होते.ग्राहक हक्कांबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक दिन हा आतंरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो.

जागतिक ग्राहक दिनाची 2021 ची थीम काय?

जागतिक ग्राहक दिनानिम्मित दरवर्षी विविध विषयांवर भाष्य करणारी थीम निवडली जाते. यंदाच्या ग्राहक दिनानिमित्त “Tackle Plastic Pollution.” ही थीम निवडण्यात आली आहे. परिसंस्था सध्या एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मुळे विविध समस्यांना तोंड देत आहे. महासागरांमध्ये प्लास्टिक वाढत आहे. त्यामुळे ग्राहक दिन साजरा करत अशताना प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली.

राष्ट्रीय ग्राहक दिन

भारतात 1986 मध्ये 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. नंतर 15 मार्च 2003पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा 1987मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.

हे आहेत ग्राहकांचे मुख्य अधिकार

– सुरक्षिततेचा अधिकार

– माहितीचा अधिकार

– निवड करण्याचा अधिकार

– समस्या निराकरण करण्याचा अधिकार

– ग्राहक शिक्षणाचा अधिकार

संबंधित बातम्या:

मुंबई पोलिसातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल

Gold latest price : पुन्हा वाढले सोन्या-चांदीचे भाव, वाचा आजचे ताजे दर

(World Consumer Rights Day 2021 why celebrate on 15 March know details)