Akshay Tritiya 2022 : भारताच्या विभिन्न भागात वेगेवेगळ्या प्रकारे साजरी होते अक्षय तृतीया

| Updated on: May 01, 2022 | 6:45 PM

अक्षय्य तृतीयेचा सणा हा एक असा आहे ज्या दिवशी सोने, चांदी, भांडी, वाहन इत्यादी खरेदी करण्यापासून प्रत्येक काम शुभ ,सकारात्मक कार्य केले जाते. भारतातील श्रीमंतांपासून ते भारतीय शेतकरीही अक्षय्य तृतीयेला आपापल्या परीने साजरे करतात. भारताच्या विविध भागात अक्षय्य तृतीया वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

Akshay Tritiya 2022 : भारताच्या विभिन्न भागात वेगेवेगळ्या प्रकारे साजरी होते अक्षय तृतीया
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: Tv9
Follow us on

साडेतीन मुहर्तापैकी एक मुर्हत असलेला अक्षय तृतीया (Akshay Tritiya)हा भारतात सर्वत्रच अत्यंत पवित्र मनाला जातो. भारतीय समाजात या पवित्र दिवसाचा योग इतका शुभ आहे की, प्रत्येकाला या दिवशी शुभ कार्य करावेसे वाटते. अक्षय्य तृतीयेचा सण(Festival) हा एक असा आहे ज्या दिवशी दिवशी सोने, चांदी, भांडी, वाहन इत्यादी खरेदी करण्यापासून प्रत्येक काम शुभ , सकारात्मक कार्य केले जाते. भारतातील श्रीमंतांपासून ते भारतीय शेतकरीही(farmer) अक्षय्य तृतीयेला आपापल्या परीने साजरे करतात. भारताच्या विविध भागात अक्षय्य तृतीया वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

गुजरात

गुजरातमध्ये अक्षय्य तृतीयेला सोने, चांदी, हिरा इत्यादी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दागिन्यांची खरेदी केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी राहते, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.गुजरातमधील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये या दिवशी खरेदीसाठी मोठी गर्दी असते. विशेषत: सराफा बाजारात जास्त गर्दी असते. गुजराती जैन समाजासाठी हा सण महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते.

ओडिशा

ओडिशामध्ये अक्षय्य तृतीया मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी येथे सोने, चांदी इत्यादी दागिन्यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच हा शुभ दिवस शेतकर्‍यांशी नाते जोडणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो . असे म्हटले जाते की या शुभ दिवशी ओडिशातील शेतकरी त्यांच्या शेतात नांगरणी आणि पेरणीचे काम करतात.

हे सुद्धा वाचा

पंजाब व हरियाणा

पंजाब आणि हरियाणामध्ये अक्षय्य तृतीया सण शेतीशी जोडलेला आहे. या दिवशी शेतकरी ब्रह्म मुहूर्तावर त्यांच्या शेतात जातात. चांगल्या पिकांच्या उत्पन्नासाठी धरणीची , वसुंधरेची पूजा ,प्रार्थना करतात. येथे अशीही आख्यायिका आहे की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेतात जाताना शेतकऱ्याला वाटेत कोणताही प्राणी आणि पक्षी दिसला तर ते शुभ मानले जाते.

मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश

अक्षय्य तृतीयेचा दिवशी मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये दान आणि परोपकाराशी जोडला गेलेला आहे. या दिवशी केलेले दान खूप शुभ असते. असे तिथे
मानले जाते. याबरोबरच नागरिक सोने, चांदी इत्यादी खरेदी करणे शुभ मानतात.