Ind vs Ban: बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज फ्लॉप, इतक्या रन्सचं आव्हान

| Updated on: Dec 04, 2022 | 3:21 PM

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरीज सुरु झाली आहे. या सीरीजमधला पहिला सामना आज खेळला जात आहे. शेर-ए बांग्ला क्रिकेट स्टेडिअमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 187 रन केले.

Ind vs Ban: बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज फ्लॉप, इतक्या रन्सचं आव्हान
Follow us on

India vs Bangladesh : बांगलादेशच्या विरुद्ध टीम इंडिया (Team India) पहिल्या वनडे सामन्यात खराब कामगिरीमुळे मोठा स्कोर उभा करु शकली नाही. ही वनडे सीरीज टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पण पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केलीये. ( Indian batsman flop in front of Bangladesh bowlers in First ODI)

भारताने बांगलादेश पुढे विजयासाठी 187 रनचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडिया संपूर्ण 50 ओव्हर देखील खेळू शकली नाही. संपूर्ण टीम 41.2 ओव्हरमध्ये फक्त 186 रनच करु शकली. भारतासाठी केएल राहुलने सर्वाधिक 73 रनची खेळी केली. रोहित शर्माने 27 आणि श्रेयस अय्यरने 24 रन केले.

बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक पाच विकेट घेतले. तर इबादत हुसैन याने 4 विकेट घेतले. भारताकडून शिखर धवन याने 7 रन, विराट कोहलीने 9 रन, वॉशिंग्टन सुंदरने 19 रन, शाहबाज अहमदने 0 रन, शार्दुल ठाकूरने 2 रन केले.

शाकिबने भारतीय फलंदाजांचा चांगलेच धक्के दिले. त्याने 10 ओव्हरमध्ये फक्त 36 रन दिले. त्याने 2 ओव्हर मेडन टाकल्या. तर 37 डॉट बॉल टाकले. या दरम्यान त्याने 5 भारतीय फलंदाजांना पव्हेलियनमध्ये परत पाठवलं.