भारताला ऑस्ट्रेलियात 70 वर्षात पहिल्यांदाच इतिहास रचण्याची संधी : सचिन

| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई : स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पहिल्या मालिका विजयाची प्रतिक्षा करत असलेल्या भारतीय संघासाठी यावेळी सुवर्ण संधी आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन इतिहास रचण्याची भारताकडे संधी असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं म्हणणं आहे. सचिनला त्याच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर एकदाही मालिका जिंकता आली नाही. भारतीय संघ विंडीजविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियात मोठ्या दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी-20 […]

भारताला ऑस्ट्रेलियात 70 वर्षात पहिल्यांदाच इतिहास रचण्याची संधी : सचिन
Photo : ICC
Follow us on

मुंबई : स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पहिल्या मालिका विजयाची प्रतिक्षा करत असलेल्या भारतीय संघासाठी यावेळी सुवर्ण संधी आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन इतिहास रचण्याची भारताकडे संधी असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं म्हणणं आहे. सचिनला त्याच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर एकदाही मालिका जिंकता आली नाही.

भारतीय संघ विंडीजविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियात मोठ्या दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका, चार कसोटी सामने आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत.

भारतीय टीम इसी महीने के आखिर में लंबे ऑस्ट्रेलिया दौरे के लिए रवाना हो जाएगी. जहां पर उसे तीन टी20, चार मैचों की टेस्ट सीरीज़ और तीन वनडे मुकाबले खेलने हैं. या दौऱ्यात भारताचं लक्ष्य असेल ते म्हणजे ऑस्ट्रेलियात पहिली वहिली कसोटी मालिका जिंकणं. सध्या ऑस्ट्रेलिया संघ कठिण परिस्थितीतून जात आहे. त्यांच्याकडे सध्या ना व्यवस्थापन आहे, ना अनुभवी खेळाडू. अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ सध्या बंदीची शिक्षा भोगत आहेत.

ही सर्व परिस्थिती पाहता भारत इतिहास रचूनच परतणार, असा विश्वास सचिनला आहे. आपल्याकडे ऑस्ट्रेलियात जिंकण्याची मोठी संधी आहे. ऑस्ट्रेलिया संघ जसा होता, तसा सध्या दिसत नाही. त्यांच्याकडे स्मिथ आणि वॉर्नर सध्या नाहीत. त्यामुळे तिथे जाऊन काहीतरी खास करण्याची सध्या संधी आहे, असं सचिनचं म्हणणं आहे.

भारताच्या दौऱ्याची सुरुवात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने होईल, ज्यानंतर 6 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक-एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तर कॅमरन बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली होती. तेव्हापासून ऑस्ट्रेलिया संघाचं कंबरडं मोडलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी-20 मालिका

पहिला सामना – 21 नोव्हेंबर

दुसरा सामना – 23 नोव्हेंबर

तिसरा सामना – 25 नोव्हेंबर

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी