Tokyo Olympics आधी भारतीय कुस्तीपटूंची कमाल, कुस्तीपटू अमन आणि सागरने जिंकले कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

| Updated on: Jul 21, 2021 | 12:18 PM

टोक्यो ऑलम्पिक सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. यंदा भारतीय कुस्तीपटूंकडून गोल्ड मेडल मिळवण्याची आशा सर्वचजण व्यक्त करत आहेत.

Tokyo Olympics आधी भारतीय कुस्तीपटूंची कमाल, कुस्तीपटू अमन आणि सागरने जिंकले कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
अमन गूलिया
Follow us on

बुडापेस्ट : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या टोक्यो ऑलम्पिकला (Tokyo Olympics) 23 जुलैला सुरुवात होणार आहे.  पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जगातील या सर्वात मोठ्या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. भारतही या स्पर्धांसाठी सज्ज झाला आहे. यंदा भारताने दरवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक खेळाडू ऑलम्पिकला पाठवले आहेत. त्यामुळे यंदा भारत सुवर्णपदकं पटकावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारताला गोल्ड मिळवून देणाऱ्या खेळाडूंमध्ये कुस्तीपटूंना ही मोठं दावेदार मानलं जात आहे. यामध्ये बजरंग पुनिया (Bajranh Puniya) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) या दिग्गजांना समावेश आहे.

दरम्यान या भव्य स्पर्धेआधीच भारताचे युवा कुस्तीपटू अमन गूलिया (Aman Gulia) आणि  सागर जगलान (Sagar Jaglan) यांनी वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World Cadet Championship 2021) सुवर्ण पदक पटकावलं आहे. हंगेरी देशाची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी भारताने 4 पदक मिळवले. ज्यात अमन आणि सागर गोल्ड मेडल मिळवलं. साहिल आणि जसकरण सिंग यांनीही एक-एक पदक मिळवून दिलं.

अमनची अप्रतिम कामगिरी

भारताला स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अमनने 48 किलोग्राम वर्गाच्या फायनलमध्ये अमेरिकेचा कुस्तीपटू ल्यूक जोसेफ लिलेडाहल यांला 5-2 च्या फरकाने पराभूत करत गोल्ड मेडल पटकावलं. अमनने स्पर्धेत सुरवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला. अमेरिकेचा कुस्तीपटू अमनपेक्षा उंचीने अधिक होता तरी अमनने त्याला धोबीपछाड करत विजय निश्चित केला. तर 80 किलोग्राम वर्गात सागरने जेम्स मॉकलर राउले याला 4-0 ने नमवत भारताला दुसरं गोल्ड मिळवून दिलं.

हे ही वाचा :

Tokyo Olympics मध्ये ‘या’ दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस

(Indian wrestlers amit gulia and sagar jaglan win gold medals in world cadet championship 2021)