Happy Birthday Abhijit Kunte : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला बुद्धिबळपटू

| Updated on: Mar 03, 2022 | 8:00 AM

बुद्धीबळ या खेळात जागतिक स्तरावर मोठं नाव कमावणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे (Abhijit Kunte) हे नाव आदराने घेतलं जातं. ग्रँडमास्टर (Grandmaster) हा किताब मिळविणारा तो पहिला पुणेकर आणि दुसरा महाराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे.

Happy Birthday Abhijit Kunte : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला बुद्धिबळपटू
Abhijit Kunte
Image Credit source: Twitter / Abhijit Kunte
Follow us on

मुंबई : बुद्धीबळ या खेळात जागतिक स्तरावर मोठं नाव कमावणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे (Abhijit Kunte) हे नाव आदराने घेतलं जातं. ग्रँडमास्टर (Grandmaster) हा किताब मिळविणारा तो पहिला पुणेकर आणि दुसरा महाराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. या मराठमोळ्या बुद्धीबळपटूचा आज 45 वा वाढदिवस आहे. राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा हा पहिलाच बुद्धिबळपटू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिजितला संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने (Major Dhyan Chand Award) गौरविण्यात आले होते. अभिजीतच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडले आहेत. अभिजित कुंटे याची गेल्या वर्षी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी आणि मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

अभिजीतने आतापर्यंत ब्रिटिश अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद, राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्यपदक, आशियाई सांघिक स्पर्धेमध्ये सात पदके, आशियाई वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावलं आहे. तसेच चार वेळा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर जागतिक अजिंक्यपद आणि विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे.

बहिणीमुळे बुद्धीबळाची गोडी

मोठी बहिण बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे यांच्यामुळे अभिजीतला बुद्धिबळाची गोडी लागली. त्यानंतर त्याने मोहन फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे घेणं सुरु केलं. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्याने बारा वर्षांखालील मुलांच्या गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. त्यानंतर विविध वयोगटात सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलं. आशियाई, कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धांमध्ये अनेक पदकं त्याने पटकावली आहेत. राष्ट्रीय पुरस्कारासह मानाच्या शिवछत्रपती पुरस्कारावरही त्याने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

पुण्यासह महाराष्ट्रात बुद्धिबळ संस्कृती वाढवण्यात अभिजीतचा मोठा वाटा आहे. त्याचं यश पाहून पुण्यातल्या अनेक मुलांनी बुद्धीबळात रस घेतला. आता देशाच्या निवड समितीचा अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक या नात्याने तो नव्या पिढीतील बुद्धिबळपटू घडवत आहे.

इतर बातम्या

Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Salil Ankola: 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती, मग बॉलिवूड गाजवलं, आता मुंबई क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी

Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब