वडिलांचं निधन, आई धुणी-भांडी करुन भरते पोट, तरी परिस्थितीवर मात करत सागू खेळणार राष्ट्रीय हॉकी स्पर्धा

| Updated on: Oct 21, 2021 | 11:12 PM

अनेकदा प्रतिभा असतानाही परिस्थितीमुळे स्वप्न पूर्ण होत नाहीत. पण मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर वाईट परिस्थितीतवरही मात करता येतेच. याचाच प्रत्यय सागू हिने दिला आहे.

वडिलांचं निधन, आई धुणी-भांडी करुन भरते पोट, तरी परिस्थितीवर मात करत सागू खेळणार राष्ट्रीय हॉकी स्पर्धा
सागू ही एका अत्यंत गरीब परिवारातून आलेली आहे.
Follow us on

मुंबई: अनेकदा प्रतिभा असतानाही परिस्थितीमुळे स्वप्न पूर्ण होत नाहीत. पण मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर वाईट परिस्थितीतवरही मात करता येतेच. याचाच प्रत्यय सागू हिने आणून दिला आहे. झारखंड येथे खेळवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ट महिला हॉकी चॅम्पियनशिपमध्ये मध्य प्रदेशच्या मंदसौर (Mandsaur) येथील सागू डाबर (Sagu dabar) ही भाग घेणार आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने धुणी-भांडी करुन सांभाळलेली सागू एका झोपडीतून आता थेट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उतरणार आहे.

ही हॉकी स्पर्धा 21 ते 30 ऑक्टोबर दरम्यान झारखंडच्या सिमडेगा, रांची येथे पार पडणार आहे. यावेळी विविध राज्याचे संघ भाग घेणार असून मध्य प्रदेशच्या महिला हॉकी संघातून सागू स्पर्धेत भाग घेणार आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील सागूच्या वडिलांच 18 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. तेव्हापासून आईने सागू आणि तिच्या भावडांना सांभाळला. इतरांच्या घरची धुनी-भांडी करुन सांभाळत असलेल्या सागूच्या आईला एक पक्क घरही बांधता आलं नाही. अत्यत साध्या झोपडीत सागूचं कुटुंब राहतं.

परिस्थितीतवर मात करत सागूचा संघर्ष

अशा अत्यंत गरीब परिस्थितीतही सागूने तिच्या खेळावरचं लक्ष कमी होऊ दिलं नाही. तिने मेहनतीच्या जोरावर मध्य प्रदेशच्या संघात स्थान मिळवलचं. ही बातमी तिच्या आईला कळताच त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरुन आले. त्यांनी आपल्या मुलीला आणखी मोठं होताना पाहायची इच्छा व्यक्त केली. तसंच पक्क घर नसल्याने झोपडीही नगरपालिकावाले हटवत असल्याची व्यथाही मांडली. दरम्यान या सर्वानंतर आता सागूच्या प्रतिभेला शासनाची साथ मिळते का? हे पाहाव लागेल.

हे ही वाचा-

भारताचा गोल्डन बॉय नीरज ब्रेकनंतर मैदानावर परतला, फोटो शेअर करत म्हणाला…

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन; शनिवारपासून रंगणार सामने

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

(Madhya pradeshs resident poor player sagu dabra selected for national junior womens hockey championship)