Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोना धोका वाढताच, दोन आणखी खेळाडू कोरोनाची बाधा

| Updated on: Jul 18, 2021 | 11:48 AM

बहुप्रतिक्षित टोक्यो ऑलम्पिकला 23 जुलैला सुरुवात होणार आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या महास्पर्धेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोना धोका वाढताच, दोन आणखी खेळाडू कोरोनाची बाधा
टोकियो ऑलम्पिक
Follow us on

टोक्यो :  बहुप्रतिक्षित टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympic) सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही कोरोनाचं सावट स्पर्धेवर असून बऱ्याच देशातील संघाच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ऑलम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. टोक्यो ऑलम्पिकशी संबधित दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती रविवारी (18 जुलै) दिली. याआधीच कोरोनाचा शिरकाव ऑलम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना झाला असताना आणखी कोरोना केसेस वाढत असल्यामुळे जपान सरकारसोबत ऑलम्पिक समितीची डोकेदुखीही वाढत आहे. आधीपासूनच कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धेला होणारा विरोध वाढत्या कोरोनाबाधितांमुळे आणखीच वाढला आहे.

टोक्यो ऑलम्पिक मागील वर्षी खेळवली जाणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. यंदा संपूर्ण तयारीने सुरु करण्यात येणारी स्पर्धा योग्यरित्या पार पडेल अशी आशा सर्वांनाच होती. पण पुन्हा एकदा वाढू लागलेल्या कोरोनाच्या संकटामुळे जपान सरकारची (Japan Govt) चिंता वाढली आहे. या सर्व संकाटावर मात करुन यंदा ही महास्पर्धा घेण्याचा निर्धार सरकारने केला आहे. या संपूर्ण यंदा टोक्योत तब्बल 6 हजार 700 खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑलम्पिक समिती सज्ज!

सुरक्षेचा उपाय म्हणून टोक्यो ऑलम्पिक खेळांचे आयोजन विनाप्रेक्षक मोकळ्या स्टेडियममध्ये होणार आहे. कोरोनाची लागण वाढू नये यासाछी ऑलम्पिक समितीने हे पाऊल उचलले आहे. शनिवारी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचे (IOA) अध्यक्ष थॉमस बाक यांनी जपानच्या नागरिकांना कोरोना संक्रमणापासून स्वत:चा बचाव करण्याची अपील केली.  याआधी टोक्यो ऑलम्पिकचे अध्यक्ष सिको हाशिमोटो म्हणाले होते, ‘आम्ही  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्व शक्य प्रयत्न करत आहोत.  पण तरी कोरोनाचा विस्फोट झाला तर त्याचा सामना करण्यासाठी आपणा सर्वांना सज्ज रहावे लागेल.’

सतत वाढत आहेत कोरोना केसेस

टोक्योमध्ये मागील काही दिवसांक कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. टोक्योतील नागरिकही यामुळे स्पर्धांना विरोध करत आहेत. अनेकांनी कोरोनाच्या महाकाय संकटात खेळांचे आयोजन म्हणजे एक मोठा धोका पत्करणं असल्याचंही सांगितलं आहे. आयोजक मात्र खेळ खेळवण्याच्या समर्थनार्थ असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्धा खेळवल्या जाणाऱ्या शहरातील 85 टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्याने धोका अधिक नसल्याचं म्हणणं आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympic सुरू होण्यापूर्वीच कोरोनाचा कहर, ब्राझील, रशियापाठोपाठ जपानच्या संघातही कोरोनाचा शिरकाव

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

(In Tokyo olympics 2020 2 more Athletes Found Corona Positive)