Womens Hocky Team Win: सलग तीन पराभव, ‘करो या मरो’चा सामना, एका फिल्मने भरला जोश

| Updated on: Aug 02, 2021 | 4:56 PM

भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने नमवल्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. पण इथवर पोहोचण्यासाठी भारतीय महिलांनी प्रयत्नांची शिकस्त केली.

Womens Hocky Team Win: सलग तीन पराभव, करो या मरोचा सामना, एका फिल्मने भरला जोश
भारतीय महिला हॉकी संघ
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारतीय महिला हॉकी संघाने अप्रतिम खेळ दाखवत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला सलग तीन सामने पराभूत झाल्यानंतर महिला संघाची ही कामगिरी खरच वाखाणण्याजोगी आहे. यावर बोलताना भारतीय महिला हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिन (Sjoerd Marijne) म्हणाला, ‘सलग तीन पराभवानंतर सर्वच संघाच मनोबल तुटलं होतं. त्यामुळे आत्मविश्वास जागा करण्यसाठी आणि जोश भरण्यासाठी आम्ही एक चित्रपट पाहिला. ज्यानंतर भारतीय महिलांना उत्कृष्ठ खेळ करत इतिहास रचला आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संघ एका मागोमाग एक तीन सामने पराभूत झाला. ज्यानंतर ग्रुप स्टेजमधील अखेरचे दोन सामने जिंकणे अनिवार्य होते. त्यावेळी आयर्लंड संघाविरुद्धचा सामना जो  ‘करो या मरो’ असा होता. त्याआधी फिल्म पाहिल्याने खेळाडूंचे मनोबल वाढले. दरम्यान या फिल्मचं नाव मारिनने उघड केलं नाही. मारिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयानंतर बोलताना म्हटले की, ”स्वत:वर विश्वास ठेवून स्वप्नांचा पाठलाग करणं महत्त्वाचं असतं. आपण पराभूत झालो तरी स्वत:वर विश्वास ठेवणं आपण सोडायचं नसतं. हेच मी महिला खेळाडूंना सांगितलं. मी त्यांना एक फिल्म दाखवली, जी सध्याच्या परिस्थितीशी जोडलेली असल्याने त्यांना आत्मविश्वास वाढायला मदत मिळाली.”

शाहरुख खाननेही दिल्या शुभेच्छा

मारिन याने संघातील खेळाडूंसोबत पोस्ट केलेल्या एका फोटोला रिट्विट करत भारतीय सुपरस्टार शाहरुख खानने देखील संघासह मारिनला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने ट्विटमध्ये संघाकडून सुवर्णपदकाची मागणी करत शुभेच्छा देताना स्वत:ला माजी प्रशिक्षक कबीर खान असं मजेत म्हटलं आहे. भारतीय महिला हॉकी संघावर आधारीत ‘चक दे इंडिया’ चित्रपटात शाहरुखने प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती.

संबंधित बातम्या 

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

PHOTOS : भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ पाच जणींच्या जोरावर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

(Indian Women Hocky team reached semifinal before that watched movie for inspiration says coach sjoerd marijne)