प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये, साताऱ्याच्या तिरंदाजाला मोदींचा सल्ला, माता-पित्यांना मराठीत म्हणाले,….

| Updated on: Jul 13, 2021 | 6:03 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी #cheer4india नावाचे अभियान देखील सुरु केले आहे. आता मोदीजी या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सायंकाळी 5 वाजता खेळाडूंना संबोधित करणार आहेत.

प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये, साताऱ्याच्या तिरंदाजाला मोदींचा सल्ला, माता-पित्यांना मराठीत म्हणाले,....
तिरंदाज प्रवीण जाधवशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला
Follow us on

नवी दिल्ली : लवकरच टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांना जपानच्या टोक्यो शहरात सुरुवात होणार आहे. या स्पर्धांसाठी सर्व देश आपले आघाडीचे खेळाडू पाठवत आहेत. भारताचे शिलेदारही टोक्यो ऑलम्पिकसाठी (Tokyo Olympics) 17 जुलैला रवाना होणार आहेत. संपूर्ण भारत खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवशी बोलताना मोदीजींनी चक्क मराठीत त्याची विचारपूस केली.

आधी अॅथलिटिक्स मग तिरंदाजी

मोदी यांनी प्रवीणशी संवादाची सुरुवातच मराठीतून केली ते म्हणाले, ”प्रवीणजी नमस्ते, काय कसं काय?”. त्यानंतर मोदीजींनी पहिलाच प्रश्न त्याला विचारला की, ”तू आधी अॅथलिटिक्स करत होतास मग आता अचानक तिरंदाजी स्पर्धेत ऑलम्पिकसाठी निवडला गेला आहेस. हा बदलाव कसा झाला?’ यावर खुलासा करताना प्रवीणने सांगितले. त्याचं सुरुवातीला राज्य पातळीवर अॅथलिटिक्स स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं होतं. पण त्याची प्रकृती अॅथलिटिक्ससाठी योग्य नसल्याने त्याला त्याच्या प्रशिक्षकाने वेगळा कोणतातरी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रवीणने तिरंदाजीचा सराव सुरु केला.

‘प्रवीणचे माता-पिताही चॅम्पियन’

प्रवीणने मोदीजींशी संवाद साधताना त्याच्या घरच्या परिस्थितीबाबत सांगितले. आई-वडिलांप्रमाणे मजदूरी करु लागू नये यासाठी मेहनत घेऊन मी या खेळात स्वत:ला तरबेज बनवलं असं प्रवीणने सांगितल. यावेळी मजदूरी करतही मुलाला इतका उत्कृष्ठ तिरंदाज बनवल्याने ‘प्रवीण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडीलही चॅम्पियन आहेत.’ असं मोदीजी म्हणाले. तसेच प्रवीणच्या वडिलांशी संवाद साधताना त्यांनी ‘प्रकृती बरी आहे का? असं मराठीत विचारलं ज्यावर प्रवीणच्या वडिलांनी देखील हो बरी आहे असं उत्तर दिलं.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 : 5 व्या वर्षी अनाथ, मजुरी करणाऱ्या आजीने सांभाळलं, सरावासाठी शूजही नव्हते, आता भारताकडून ऑलम्पिक गाजवणार

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

(PM Narendra Modi Interacted with maharashtras Archer Pravin Jadhav whos Participating in Tokyo Olympic 2020)