अफलातून! याला म्हणतात, मनाचा मोठेपणा, कतारच्या खेळाडूची ‘सुवर्ण’ कृती आणि जगभरातून कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Aug 02, 2021 | 8:47 PM

सुवर्ण पदकासाठी प्रत्येक खेळाडू जीवाचं रान करतो. प्रतिस्पर्धी खेळाडूला मात देण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न करतात. पण एखाद्या स्पर्धेच्या अखेरीस दोन्ही खेळाडू सुवर्णपदक वाटून घेत असतील तर...

अफलातून! याला म्हणतात, मनाचा मोठेपणा, कतारच्या खेळाडूची सुवर्ण कृती आणि जगभरातून कौतुकाचा वर्षाव
मुताज बर्सहिम आणि गनमार्को तेम्बेरी
Follow us on

Tokyo Olympics 20-2021: जगातील सर्वांत मानाची स्पर्धा असणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमधील सर्वांत मानाचं पदक म्हणजे सुवर्णपदक. या पदकासाठी अनेक वर्षांचा सराव, मेहनत करुन खेळाडू अक्षरश: जीवाचे रान करतात. त्यात अंतिम सामना म्हटलं की खेळाडूंमध्ये कायम चुरशीची टक्कर पाहायला मिळते. पण रविवारी लांब उडी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक वेगळच चित्र पाहायला मिळालं. स्पर्धेच्या अखेरीस असं काही घडलं की दोन्ही खेळाडूंनी सुवर्णपदक वाटून घेतलं आणि त्याच्यांतील एका स्पर्धकाने दाखवलेल्या माणूसकीचं उदाहरणाने जगभरातील सर्वांचच मन भरुन आलं.

दिवसाच्या शेवटच्या सत्रात सुरु असलेल्या सामन्यात लांब उडीचे अंतिम सामने सुरु होते. यामध्ये कतारचा मुताज बर्सहिम आणि इटलीचा गनमार्को तेम्बेरी आणि बेलारुसच्या माकसिम हे तिघे खेळत होते. तिघांनी 2-37 मीटर उंच उडी मारली. मात्र तिघांनाही 2.39 च्या विक्रमापर्यंत पोहचता आलं नाही. त्यात बेलारुसच्या माकसिमला योग्य पद्धतीने उडी मारता न आल्याने त्याला तिसरं स्थान देत कांस्यपदक देण्यात आलं. तर पहिल्या स्थानासाछी मुताज आणि गनमार्को  यांच्यामध्ये पुन्हा स्पर्धा घेण्यात आली. पण दोघांनाही 2.37 पेक्षा लांब उडी मारता न आल्याने आणखी संधी देण्यात आल्या. पण चौथ्या संधीवेळी इटलीच्या गनमार्कोने दुखापती मुळे माघार घेतली. ज्यामुळे शेवटची संधी घेऊन मुताज सहज सुवर्णपदक खिशात घालू शकला असता पण त्याने असं न करता पंचाशी बोलून  मी देखील माघार घेतली तर आम्ही पदक वाटून घेऊ शकतो का? असं विचारलं. ज्यावर पंचानी होकार देत सुवर्णपदक वाटून देण्याची घोषणा केली.

 गनमार्कोचा आनंद गगनात मावेना!

पंचाच्या निर्णय़ानंतर त्याच क्षणी इटलीचा गनमार्कोने मुताजला धावत येऊन मिठी मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून माणूसकी आणि मैत्रीच्या नात्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या अंतिम सामन्याची वाह वाह करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

(Qatars Mutaz Barshim and Italys Gianmarco Tamberi shares high jump gold medal)