Tokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल

| Updated on: Jul 27, 2021 | 5:51 PM

टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा (Tokyo olympic 2020) आज पाचवा दिवस आहे. मात्र आजचा दिवस भारतासाठी  निराशाजनक ठरला आहे. आज भारताला काहीही खास कामगिरी करता आली नाही.

Tokyo Olympics 2020 Live : भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक हॉकीसह, महिला बॉक्सर लवलीनाचीही कमाल
Tokyo olympic 2020
Follow us on

टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेच्या (Tokyo olympic 2020) पाचव्या दिवशीच्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशीच वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंना काही खास कामगिरी करता आली नाही. पीव्ही सिंधू आणि मेरी कोम सोडता बहुतांश खेळाडूंना पराभवच स्वीकारावा लागला. दरम्यान आजच्या पाचव्या दिवसाची सुरुवात हॉकी संघाने स्पेनवर 3-0 ने विजय मिळवून केल्याने भारताच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jul 2021 03:28 PM (IST)

    सेलिंग – विष्णु सरवनन 23 व्या स्थानावर

    ऑलिम्पकमध्ये आज झालेल्या सेलिंग स्पर्धेत भारताच्या वरुण ठक्कर आणि केसी गणपति यांनी पुरुष स्किफ 49 ईआर रेस-1 मध्ये 18 वं स्थान मिळवलं. या स्पर्धेची रेस-2 आणि रेस-3 अजून होणं बाकी आहे. महिलांमध्ये नेत्रा कुमाननने लेजर रेडियल रेस-5 मध्ये 32 वं स्थान मिळवलं. तर पुरुषांमध्ये विष्णु सरवननने लेजर रेस-4 मध्ये 23 वं स्थान मिळवलं आहे.

  • 27 Jul 2021 02:41 PM (IST)

    विजयानंतर भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणतात…

    भारताने ऑलिम्पिकमधील दुसरा विजय स्पेन संघाला 3-0 ने मात देत मिळवला. यानंतर संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम यांनी आजचा खेळ चांगलाच होता पण अधिक चांगल्या निकालासाठी अधिक चांगली कामगिरी करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया दिली.


  • 27 Jul 2021 02:12 PM (IST)

    निशानेबाजी : चीन संघाला सुवर्णपदक

    चीन संघाने  10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीम स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक खिशात घातलं आहे.

  • 27 Jul 2021 11:25 AM (IST)

    बॉक्सींग : लवलिनाचा अप्रतिम विजय

    भारताची बॉक्सर लवलिना 69 किलोग्राम वजनी गटात विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. जर्मनीच्या एपेट्ज नेदिनला पराभूत करत तिने क्‍वार्टर फायनल गाठली आहे. लवलिनाने एपेट्जवर 3-2 च्या फरकाने विजय मिळवला.

  • 27 Jul 2021 10:47 AM (IST)

    टेनिस : नाओमी ओसाकाचा पराभव

    जगातील आघाडीची टेनिसपटू जपानची महिला खेळाडू नाओमी ओसाका महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभूत झाली आहे. जगातील 42 व्या नंबरची खेळाडू चेक रिपब्लिकच्या मार्केचा वोड्रोउसोवाने नाओमीला 6-1, 6-4 च्या फरकाने पराभूत केलं आहे.

  • 27 Jul 2021 10:29 AM (IST)

    निशानेबाजी : 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेतून भारत बाहेर

    निशानेबाजीमध्ये भारताला अजून एका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताची दिव्यांश-इलावेनिल जोडी 626.5 चा स्कोर करत 12 व्या स्थानावर राहिली. तर अंजुम-दीपकच्या जोडीने 623.8 चा स्कोर करत 18 वं स्थान मिळवलं. दोघांपैकी एकही जोडी टॉप 8 मध्ये न जाऊ शकल्याने स्पर्धेतून बाहेर गेली आहे.

  • 27 Jul 2021 10:18 AM (IST)

    टेबल टेनिस : अचंता शरत कमलला स्वीकारावा लागला पराभव

    भारताचा दिग्गज टेबल टेनिस खेळाडू अचंता शरत कमलची टोक्यो ओलिम्पिक यात्रा संपली आहे. पुरुष एकेरीमध्ये तिसऱ्या फेरीतील सामन्यात चीनच्या के मा लोंग याने त्याचा पराभव केला. अचंताला  4-1 (11-7, 8-11, 13, 11, 11-4, 11-4) च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.