भारताचा गोल्डन बॉय नीरज ब्रेकनंतर मैदानावर परतला, फोटो शेअर करत म्हणाला…

| Updated on: Oct 21, 2021 | 3:29 PM

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा आता स्टार आयकॉन बनला आहे, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजयापासून नीरजचे आयुष्य रातोरात बदललं आहे.

भारताचा गोल्डन बॉय नीरज ब्रेकनंतर मैदानावर परतला, फोटो शेअर करत म्हणाला...
नीरज चोप्रा
Follow us on

नवी दिल्ली : 7 ऑगस्ट, 2021 रोजी भारतात अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहरापर्यंत सर्वत्र एकच नाव ऐकू येत होतं. सोशल मीडियावर एकाच व्यक्तीच्या फोटोंचा पाऊस पडत होता. ती व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा (Neeraj Chopra). टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला होता. दरम्यान या सुवर्णकामगिरीनंतर काही काळ विश्रांती घेत नीरज सुटीची मजा घेत होता. त्यानंतर आता त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केली असून नुकतीच त्याच्या सोशल मीडियावरु सरावाचे फोटो शेअर केले.

नीरजने हे सरावाचे फोटो ट्विट करत लिहिलं आहे की,“पहिली जिंकायची जितकी भूक आणि इच्छा होती, तितकीच आताही आहे. मागील ऑलिम्पिकप्रमाणे सरावाला सुरुवात करणं भारीच आहे. मला दिलेल्या पाठिंब्यासह विविध मेसेजससाठी सर्वांचे धन्यवाद.”

असं मिळवलं नीरजनं सुवर्णपदक

भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीराजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

हे ही वाचा-

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

(Tokyo Olympics Gold winner Neeraj chopra started his training again shares pictures on social media)