Tokyo Olympic सुरू होण्यापूर्वीच कोरोनाचा कहर, ब्राझील, रशियापाठोपाठ जपानच्या संघातही कोरोनाचा शिरकाव

| Updated on: Jul 15, 2021 | 6:47 PM

टोक्यो ऑलम्पिकला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच तिथे आलेल्या वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव होत आहे. यामुळे आयोजकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Tokyo Olympic सुरू होण्यापूर्वीच कोरोनाचा कहर, ब्राझील, रशियापाठोपाठ जपानच्या संघातही कोरोनाचा शिरकाव
टोकियो ऑलम्पिक
Follow us on

टोक्यो :  बहुप्रतिक्षित टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympic) सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही कोरोनाचं सावट स्पर्धेवर असून बऱ्याच देशातील संघाच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण होत आहे. नुकतीच जपानच्या एका ऑलम्पिकपटूसह 5 ऑलम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. याआधी रशिया आणि ब्राझीलच्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

टोक्यो ऑलम्पिक मागील वर्षी कोरोनाच्या (Corona) संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मागील वर्षी 21 जुलैपासून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली होती. आता यावर्षी सर्व उपाययोजना करुन जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने 23 जुलैपासून स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकट स्पर्धेसमोर आवासून उभे आहे.

जपानच्या खेळाडूला कोरोनाची बाधा

समोर आलेल्या माहितीनुसार जपानच्या ऑलम्पिक दलातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सहा जणांमध्ये एक खेळा़डू असून काही कॉन्ट्रेक्टर आणि काही स्पर्धेच्या सपोर्ट स्टाफमधील व्यक्ती आहेत. आतापर्यंत यातील कोणाचीच ओळख जपान सरकारने जाहिर केलेली नाही. या नव्याने आढळलेल्या केसेसमुले पुन्हा एकदा स्पर्धेच्या आयोजनांवर प्रश्न उठवले जात आहेत.

रशिया आणि ब्राझीलच्या ऑलम्पिक दलातही कोरोना

जपानच्या दलात कोरोना शिरकाव होण्याआधी जपानचे ऑलम्पिक खेळांच्या व्यवस्थेसाठी असणाऱ्या हमामात्सु शहरातील एका हॉटेलच्या 8 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याच हॉटेलमध्ये ब्राझील संघाचेही 30 सदस्य थांबले होते. दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाने संबधित कोरोनाबाधित कर्मचारी कोणत्याच ब्राझीलच्या संघातील सदस्याच्या संपर्कात आले नसल्याचे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे रशियाच्या रग्बी संघातील एका खेळाडूला ही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

Tokyo Olympics 2020 : हे आहेत स्पर्धेतील सर्वात स्टायलिश खेळाडू, मैदानावर विखुरतात जलवा, फोटो पाहाच