Maharashtra Kesari 2023 शिवराज राक्षेचा सन्मान केल्यानंतर उदयनराजे काय म्हणाले?

| Updated on: Jan 17, 2023 | 3:07 PM

Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला. मागच्याच आठवड्यात पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली.

Maharashtra Kesari 2023 शिवराज राक्षेचा सन्मान केल्यानंतर उदयनराजे काय म्हणाले?
Maharashtra kesari 2023
Follow us on

सातारा: महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला. मागच्याच आठवड्यात पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली. फायनलमध्ये शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेकडे राज्यभरातील कुस्तीप्रेमींच लक्ष असतं. महाराष्ट्र केसरीच मैदान मारण्यासाठी अनेक कुस्तीपटू वर्षानुवर्ष मेहनत घेतात. महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या कुस्तीपटूला एक वेगळी ओळख मिळते.

स्पर्धेच नियोजन अत्यंत उत्कृष्ट

शिवराज राक्षेचा सन्मान केल्यानंतर उदयनराजे म्हणाले की, “पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच नियोजन अत्यंत उत्कृष्ट झालं. कुस्ती ही पूर्वीपासून खेळली जात आहे. मी प्रत्यक्षात टीव्हीवर हा कुस्ती सामना पाहत होतो”

शिवराजला मानलं पाहिजे

“शिवराजला मानलं पाहिजे. त्याने स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्याला मिळाला” असं उदयनराजे म्हणाले. “शिवराज राक्षेला मनापासून शुभेच्छा. तो तरुण आहे, त्याला भरपूर स्कोप आहे. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये मोठं राजकारण पाहायला मिळतं. ते थांबलं पाहिजे” असं उदयनराजे म्हणाले.

कोणावर अन्याय नको

“वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्पोर्ट्समन्सना काहीवेळा नैराश्य येतं. वाटतं की, एवढे सगळे कष्ट केले. माझ्यापेक्षा त्याने कष्ट घेतले नाहीत, तरी त्याला संधी दिली जाते. असं होता कामा नये” असं उदयनराजेंनी सांगितलं. “ऑलिम्पिकला भारताची मोठी टीम जाते. पण मेडल एखादच मिळतं. पण घाना, कॅमरुन या देशातील 10-15 जण जातात आणि तीन-चार मेडल घेऊन येतात” असं उदयराजेंनी सांगितलं. खेळात राजकारण नको, असं त्यांनी सांगितलं.